अमित शाहांचा औरंगाबाद दौरा रद्द ; 'या' कारणाने दौरा रद्द झाल्याची भाजप नेत्यांची माहिती

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे १७ सप्टेंबर रोजी औरंगाबादच्या दौऱ्यावर येणार होते. याबाबत शाह यांचा दौरा देखील आला होता.
अमित शाहांचा औरंगाबाद दौरा रद्द ; 'या' कारणाने दौरा रद्द झाल्याची भाजप नेत्यांची माहिती

आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने रणनिती आखायला सुरुवात केली आहे. देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेल्या इंडिया आघाडीनंतर भाजप प्रणित एनडीए अधिक सक्रियतेने निवडणुकांच्या कामाला लागली आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अमित शाह हे देशभर फिरुन भाजपची संघटनात्मक बांधणी करण्यावर भर देताना दिसत आहे. इंडिया आघाडीने देखील यावेळी भाजपला मात देण्यासाठी पुरेपूर तयारी केल्याचं दिसून येत आहे. अशात अमित शाहांच्या औरंगाबाद दौऱ्याविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे १७ सप्टेंबर रोजी औरंगाबादच्या दौऱ्यावर येणार होते. याबाबत शाह यांचा दौरा देखील आला होता. मात्र आता त्यांचा औरंगाबाद दौरा रद्द झाला आहे. १७ सप्टेंबर रोजी अमित शाहा यांचं वेळेचं नियोजन होत नसल्याने हा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती स्थानिक भाजप नेत्यांकडून देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे अमित शाह यांच्या १७ सप्टेंबर रोजीच्या औरंगाबाद दौऱ्याची भाजपकडून आणि प्रशासनाकडून जय्यत तयारी देखील करण्यात आली होती. मात्र, आता हा दौरा रद्द करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in