अजित पवारांना मोठा धक्का ! "जब दिल और दिमाग में..." म्हणत अमोल कोल्हे यांचं ट्विट

अजित पवारांसह नऊ नेत्यांच्या शपथविधीला अमोल कोल्हे आणि सुनिल तटकरे यांची उपस्थिती होती
अजित पवारांना मोठा धक्का ! "जब दिल और दिमाग में..." म्हणत अमोल कोल्हे यांचं ट्विट

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्याच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत ३० आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी केली. रविवार (२ जुलै) दुपारी राजभवन येथे अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादीच्या आठ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांसह नेत्यांनी घेतलेल्या शपथविधीला पाठिंबा नसल्याचं शरद पवार यांनी जाहीर केलं आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या झालेल्या शपथविधीला राष्ट्रवादीचे शिरुर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे आणि सुनिल तटकरे यांची उपस्थिती होती. अजित पवारांनी केलेल्या बंडाला या ३० आमदारांसह या दोन खासदारांचा देखील पाठिंबा असल्याचं बोललं जात होतं. आता अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे.

अजित पवार यांना शपथ घेऊन २४ तास उलटत नाही तोवर मोठा धक्का बसला आहे. शपथविधीला हजर असणाऱ्या दोन खासदारांपैकी अमोल कोल्हे यांनी ट्विट करत आपली भूमिका जाहीर केली आहे. त्यांनी ट्विट करत, "जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो । शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है …पर दिल कभी नहीं। #मी_साहेबांसोबत" असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ नेत्यांनी शपथ घेतली त्यावेळी अमोल कोल्हे यांची राजभवनात उपस्थिती होती. त्यामुळे कोल्हे हे अजित पवारांच्या पाठिशी असल्याचं म्हटलं जात होत. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात होता. मात्र, आज अमोल कोल्हे यांनी मी साहेबांसोबत असल्याचं ट्विट केलं आहे. हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

अमोल कोल्हे यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना यावर स्पष्टीकरण दिल आहे. ते म्हणाले की, मला कालच्या शपथविधीची कल्पना नव्हती. मी पवारंकडे वेगळ्या चर्चेसाठी गेलो होता. त्यावेळी अचानक शपथविधी झाला. पण माझी भावना ही आहे की मी शरद पवार साहेबांसोबत आहे. मी जाहीरपणे सांगतोय, साहेबांना भेटूनही सांगेन की मी त्यांच्यासोबत आहे. वडिलधाऱ्यांना वाकून नमस्कार करणे ही आपली संस्कृती आहे. काल शपथ घेणाऱ्यांच अभिनंदन केलं. मात्र, मी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. कारण माझ्यासाठीच हा धक्का होता. शपथ घेणाऱ्यांचा तो निर्णय होता. असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in