Amravati Car Accident : तेलंगणातील पर्यटकांवर काळाचा घाला ; कार २०० फूट दरीत कोसळल्याने चार जणांचा मृत्यू, तर चार जण जखमी

थंड हवेचं ठिकाण असलेल्या चिखलदऱ्यात तेलंगणातील आदिलाबाद येथून हे पर्यटक फिरण्यासाठी आले होते.
Amravati Car Accident : तेलंगणातील पर्यटकांवर काळाचा घाला ; कार २०० फूट दरीत कोसळल्याने चार जणांचा मृत्यू, तर चार जण जखमी

अमरावती जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना झाली आहे. भरधवा वेगाने जाणारी कार २०० फूट खोल दरीत कोसळल्याने धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील चिखल दऱ्यात ही घटना घडली. या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घटनेत कारचा देखील चक्काचूर झाला आहे.

रविवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला असल्याचं सांगितलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखळ झाल्यावर त्यांच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आलं.

प्राप्त माहितनुसार थंड हवेचं ठिकाण असलेल्या चिखलदऱ्यात पर्यटक फिरण्यासाठी आले होते. तेलंगणातील आदिलाबाद येथून हे आठ पर्यटक आले होते. या भागात रिमझिम पाऊस सुरु होता. चिखलदरा मार्गावरुन जात असताना त्यांची भरधाव कार २०० फूट खोल दरीत कोसळली. यात आठपैकी चार जणांचा मृत्यू झाला. तर चार जणांना गंभीर दुखापत झाली आहे. स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने बचावकार्य करण्यात आलं.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in