"देवेंद्रजींनी मारले नाकर्तेपणावर बाण आणि मी...", अमृता फडणवीसांचा उखाण्यातून विरोधकांना टोला

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमी चर्चेत असतात. कधी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा होते, तर कधी त्यांच्या गाण्याची. आता मात्र त्यांचा खास उखाणा चर्चेत आहे.
"देवेंद्रजींनी मारले नाकर्तेपणावर बाण आणि मी...", अमृता फडणवीसांचा उखाण्यातून विरोधकांना टोला
(संग्रहित छायाचित्र)

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमी चर्चेत असतात. कधी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा होते, तर कधी त्यांच्या गाण्याची. आता मात्र त्यांचा खास उखाणा चर्चेत आहे.

नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने दक्षिण-पश्चिम मंडळाकडून विकासाचे वाण हळदी कुंकू या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले होते. अमृता फडणवीस देखील कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. यावेळी अमृता फडणवीस यांनी घेतलेला खास उखाणा चांगलाच गाजला.

"देवेंद्रजींनी मारले नाकर्तेपणावर बाण आणि मी घेऊन आले विकासाचे वाण.. आपण सर्वांनी स्वीकारावे आणि एकत्र महाराष्ट्र करू निर्माण', असा उखाणा अमृता फडणवीस यांनी यावेळी घेतला. अमृता यांनी उखाण्यातून विरोधकांनाही टोला लगावल्यामुळे उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. अमृता फडणवीस यांनी यावेळी कार्यक्रमात उपस्थित महिलांशी संवाद देखील साधला. महिलांच्या आग्रहाखातर त्यांनी एक गाणेही गायले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in