भारत-पाक सीमेवर उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

पाकिस्तानला देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीची भीती वाटेल, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
भारत-पाक सीमेवर उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं महाराष्ट्रात मायदेशी आणली जाणार आहेत. हे देशासाठी अभिमानास्पद असून काहीजण मात्र त्याबाबत शंका उपस्थित करत आहेत. असं म्हणत मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी वाघनखांवर शंका उपस्थित करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. वाघनखांबाबत आक्षेप घेणाऱ्यांनी शिवाजी महाराजांचा सोडून अफजल खानाचा आदर्श स्वीकारलेला दिसतो. असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

याच बरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारत-पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याची घोषणा केली आहे. असं असलं तरी त्यांनी सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर तापत असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मात्र बोलणं टाळलं. तसंच त्यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्याप्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचं देखील जानवलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य अश्वारुढ पुतळा आम्ही इथून पाठवला आहे. भारत-पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना केली जाणार आहे. पाकिस्तानला देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीची भीती वाटेल."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in