येरवडा तुरुंगात कैद्यांच्या हल्ल्यात एक कैदी ठार

तुरुंग प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, चंदनशिवे यांच्यावर अनिकेत समुद्र, महेश माने, आदित्य मुरे आणि गणेश मोरे या कैद्यांनी कात्री व दरवाज्याच्या कड्यांनी हल्ला केला.
येरवडा तुरुंगात कैद्यांच्या हल्ल्यात एक कैदी ठार

पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहात २७ वर्षांच्या महेश चंदनशिवे या कच्चा कैद्यावर पूर्ववैमनस्यातून तुरुंगातील अन्य चार कैद्यांनी केलेल्या हल्ल्यात महेशला प्राण गमवावे लागले. शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत अटक करण्यात आलेल्या महेश चंदनशिवे याला दुपारी तीनच्या सुमारास कारागृहातील बराक क्रमांक १ मध्ये लक्ष्य करण्यात आले.

तुरुंग प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, चंदनशिवे यांच्यावर अनिकेत समुद्र, महेश माने, आदित्य मुरे आणि गणेश मोरे या कैद्यांनी कात्री व दरवाज्याच्या कड्यांनी हल्ला केला. यात जखमी झालेल्या महेशला ससून रुग्णालयात दाखल केले मात्र तेथे त्याचा मृत्यू झाल्याचे तुरुंग प्रशासनाने सांगितले. या प्रकरणी चारही हल्लेखोर कैद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in