भाजप आणि फडणवीसरूपी बकासुराच्या वधासाठी भीमरूपी जनता सज्ज - अनंत गीते

भाजप अन् फडणवीसरूपी बकासुराच्या वधासाठी भीमरूपी जनता सज्ज असल्याचा ठाम विश्वास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि इंडिया आघाडीचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी व्यक्त केला.
भाजप आणि फडणवीसरूपी बकासुराच्या वधासाठी भीमरूपी जनता सज्ज - अनंत गीते

पोलादपूर : महाराष्ट्रामध्ये १०६ आमदार असल्याने सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजप आणि फडणवीसांनी अनेक वर्षे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मदतीने सत्ता मिळवली त्या शिवसेनेसमोर मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, अशी सत्तेची लालसा व्यक्त केली आणि पुन्हा सत्तेत येता आले नाही म्हणून शिवसेना फोडली सत्ता मिळवली. परंतु, ही सत्ता अल्पायुषी ठरेल अशी शंका वाटल्याने राष्ट्रवादी काँग्रेस फोडली.

यामुळे केवळ सत्तालालसेपोटी महाराष्ट्रातील आणि देशातील पक्ष फोडून भाजपने त्या पक्षांतील भ्रष्ट लोक घेऊन लोकसभेनंतरच्या सत्तेची गणितं जमविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत, या प्रयत्नांना बकासुरासारखे स्वरूप आले आहे. पक्ष फोडा आणि भाजप वाढवा, असे गलिच्छ राजकारण भाजप ज्या काँग्रेसने ७० वर्षांमध्ये काय केले असा प्रश्न विचारते, त्या काँग्रेसनेही कधी केले नाही. त्यामुळे या भाजप अन् फडणवीसरूपी बकासुराच्या वधासाठी भीमरूपी जनता सज्ज असल्याचा ठाम विश्वास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि इंडिया आघाडीचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी व्यक्त केला.

पोलादपूर तालुक्यातील लोहारे येथे जनसंवाद दौऱ्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यासमवेत जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, जिल्हासंपर्क प्रमुख संजय मानाजी कदम, आदी उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in