गोरखपूरमध्ये टोमॅटो १८० ते २०० रुपये

गोरखपूरमध्ये टोमॅटो १८० ते २०० रुपये

देशात टोमॅटोचे किलोमागे १०० रुपयांच्यावर गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणूस हैराण

जो टोमॅटो १५ दिवसांपूर्वी ५ ते ६ रुपयांना विकला जात होता. तो आता भाज्या मंडईत सर्वात महत्वाचा ठरला आहे. सर्वात जास्त किंमती विकली जाणारी भाजी ही टोमॅटोच आहे. घाऊक बाजारात टोमॅटोची किंमत १२० रुपये होती. तर किरकोळ बाजारात टोमॅटो १८० ते २०० रुपये किलोने मिळत आहे.

आंधप्रदेश सरकार ५० रुपये किलोने टोमॅटो विकणार

देशात टोमॅटोचे किलोमागे १०० रुपयांच्यावर गेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे. आंध्र प्रदेश सरकारने यातून मार्ग काढण्यासाठी राज्यात ५० रुपये किलोने टोमॅटो विकण्याची घोषणा केली आहे. राज्याच्या कृषी मार्केटिंग विभागाने १०३ रायथू बाजारातून ५० रुपयांना टोमॅटोची विक्री सुरू केली. टोमॅटोच्या वाढत्या किंमतीवर उतारा म्हणून राज्य सरकारने नागरिकांना अत्यंत आवश्यक ठरणारा टोमॅटो ५० रुपये किलोने विकण्यास सुरुवात केली आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आंध्रचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी कृषी मार्केटिंग विभागाला टोमॅटोची उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. रोज ५० टन टोमॅटो खरेदी करण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in