अंगणवाडी कर्मचारी आक्रमक; आज विधानभवनावर धडकणार

मानधनात वाढ, दरमहा पेन्शन, उन्हाळी सुट्टीचे थकित मानधन अशा विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवार १ जुलै रोजी विधानभवन आणि जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिला आहे.
अंगणवाडी कर्मचारी आक्रमक; आज 
विधानभवनावर धडकणार
संग्रहित छायाचित्र

मुंबई : मानधनात वाढ, दरमहा पेन्शन, उन्हाळी सुट्टीचे थकित मानधन अशा विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवार १ जुलै रोजी विधानभवन आणि जिल्हा परिषदेवर धरणे आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिला आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मानधन वाढ, दरमहा पेन्शन योजना, २०२० व २०२१ या वर्षाची उन्हाळी सुट्टीचे थकित मानधन, ग्रॅच्युईटी इत्यादी प्रश्न शासन स्तरावर अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे या प्रश्नांची चर्चा होऊ शकली नाही, म्हणून आता युद्धपातळीवर या प्रश्नांची चर्चा होऊन निर्णय होण्याची आवश्यकता आहे. आचारसंहिता संपल्याने तातडीने कृती समितीशी चर्चा करून वरील प्रश्न सोडवावे, अशी मागणी कृती समितीने केली आहे. दरम्यान, या संदर्भात अशी बैठक होऊन प्रश्न न सुटल्यास, विधानभवनावर व जिल्हा परिषदांवर निदर्शने करण्याची नोटीस दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in