अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची दिवाळी गोड होणार; प्रत्येकी २ हजार रुपये ‘भाऊबीज’ भेट देण्याचा निर्णय

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची दिवाळी गोड होणार; प्रत्येकी २ हजार रुपये ‘भाऊबीज’ भेट देण्याचा निर्णय

उन्हाळा असो वा पावसाळा आपले कर्तव्य चोख बजावणाऱ्या राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची दिवाळी गोड होणार आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दोन हजार रुपये ‘भाऊबीज’ भेट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Published on

मुंबई : उन्हाळा असो वा पावसाळा आपले कर्तव्य चोख बजावणाऱ्या राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची दिवाळी गोड होणार आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दोन हजार रुपये ‘भाऊबीज’ भेट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील ९२ हजार अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना राज्य सरकारचा दिलासा मिळाला आहे. यासाठी राज्य सरकारने ४०.६१ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे.

एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत असलेल्या या मानधनी कर्मचाऱ्यांना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी प्रत्येकी दोन हजार रुपयांची रक्कम ‘भाऊबीज भेट’ म्हणून देण्यास शासनाने मंजुरी दिली. त्यामुळे राज्यातील ९२ हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिलासा मिळाला आहे. निधीचे वितरण ‘आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई’ यांच्या नियंत्रणाखाली करण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in