ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; अनिकेत हिरडेने युपीएससीमध्ये मारली बाजी

ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था ही केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना आणि इतर संलग्न परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क मार्गदर्शन करणारी अग्रगण्य संस्था आहे.
ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; अनिकेत हिरडेने युपीएससीमध्ये मारली बाजी
Published on

ठाणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ठाणेकर असलेले अनिकेत हिरडे यांनी देशात ८१ वा रँक मिळवून ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अनिकेत ठाण्यातील टिकुजिनीवाडी परिसरात राहत असून मॉक इंटरव्युव्हचे धडे त्यांनी ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये घेतले होते. अनिकेतच्या यशामुळे ठाणेकरांची मान अभिमानाने उंचावली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) २०२३ परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी, भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय विदेश सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि केंद्रीय सेवा गट अ आणि गट ब मध्ये नियुक्तीसाठी एकूण १०१६ नावांची शिफारस करण्यात आली आहे. ठाण्यातील वसंत विहार परिसरात राहणाऱ्या समीक्षा म्हेत्रे यांनी ३०२, नेरूळच्या वृषाली कांबळे यांनी ३१० वा तर ऐरोलीच्या डॉ.स्नेहल वाघमारे यांनी देशात ९४५ वा रँक मिळवला आहे. त्यामुळे ठाण्याचे दोन तर नवी मुंबईच्या दोन विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे.

ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था ही केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना आणि इतर संलग्न परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क मार्गदर्शन करणारी अग्रगण्य संस्था आहे. सदर संस्थेतील आतापर्यंत एकूण ७६ विद्यार्थीं/प्रशिक्षणार्थींनी युपीएससी स्पर्धा परीक्षेत आणि ४०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेले आहे.

logo
marathi.freepressjournal.in