
राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांना अटक केली होती. 11 महिने 2 दिवसांच्या कोठडीनंतर अखेर अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. 2 नोव्हेंबर 2021 रोजी देशमुख यांना ईडीने अटक केली होती. आता आज अखेर त्यांना जामीन मंजूर झाला आहे.
अनिल देशमुख यांची प्रकृती काही दिवसांपूर्वीच खालावली होती.अनिल देशमुख यांच्यावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ईडीच्या खटल्यात त्यांना जामीन मिळाला आहे. मात्र त्यांच्यावर सीबीआयमध्ये देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातही त्यांना जामीन मिळाल्याशिवाय ते तुरुंगातून बाहेर पडू शकणार नाहीत. अनिल देशमुख यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.