

अहिल्यानगर : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा शहर भाजपने निषेध केला आहे. भाजपने रविवारी केलेल्या आंदोलनात हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध केला.
बेताल वक्तव्य करणाऱ्या सपकाळ यांची जीभ छाटणाऱ्यास शहर भाजपच्या वतीने १० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी आंदोलनात केली.
शहरातील जुन्या बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शहर भाजपच्या वतीने हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकारांच्या घोषणा देऊन हर्षवर्धन सपकाळ यांच्या मुर्दाबादच्याही घोषणा पदाधिकाऱ्यांनी दिल्या.