अनिल परब यांची निर्दोष मुक्तता; साई रिसॉर्ट प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय

शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा आमदार अनिल परब यांच्यावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले होते. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात जमीन हडप केल्याचा आणि शासनाच्या सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता.
अनिल परब यांची निर्दोष मुक्तता; साई रिसॉर्ट प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा आमदार अनिल परब यांच्यावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले होते. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात जमीन हडप केल्याचा आणि शासनाच्या सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. मात्र, आता खेड येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात मोठा निर्णय देत शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे, अनिल परब यांना दिलासा मिळाला आहे.

सुनावणीदरम्यान न्यायालयाने जमीन आणि बांधकाम हे स्वतंत्र घटक असल्याचे निरीक्षण नोंदवत पुराव्यांच्या आधारे सर्व आरोप सिद्ध होत नाहीत, असा निष्कर्ष काढला. त्यामुळे सर्व आरोपींना निर्दोष ठरवत न्यायालयाने त्यांची मुक्तता केली. त्यानंतर, अनिल परब यांचे साई रिसॉर्ट प्रकरण बाहेर काढणारे आणि न्यायालयात दावा करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. विशेष म्हणजे अंमलबजावणी संचालनालयाने दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात आरोपपत्र सादर केले, तेव्हा माजी मंत्री अनिल परब यांचा उल्लेखही त्यात नव्हता.

logo
marathi.freepressjournal.in