अनिल परब यांच्या विरोधात हक्कभंग आणणार; योगेश कदम यांचा इशारा

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने मुंबईत डान्स बार असल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार विधान परिषदेचे सदस्य अनिल परब यांनी परिषदेत केला होता. मात्र परब यांच्या आरोपांचे खंडन करत अनिल परब यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार, कायदेशीर कारवाई करणार, असा इशारा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने मुंबईत डान्स बार असल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार विधान परिषदेचे सदस्य अनिल परब यांनी परिषदेत केला होता. मात्र परब यांच्या आरोपांचे खंडन करत अनिल परब यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार, कायदेशीर कारवाई करणार, असा इशारा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिला आहे. सुनीती या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

योगेश कदम यांचे कार्यकर्ते वाळू चोरीत सहभागी आहेत. तसेच योगेश कदम यांच्या आईच्या नावाने मुंबईत सावली रेस्टॉरंट अँड बार आहे. या ठिकाणी पोलिसांनी छापा मारला. मुली ताब्यात घेतल्या. हा डान्सबार आहे, असा दावा देखील परब यांनी केला होता. मात्र सोमवारी योगेश कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन परब यांच्या आरोपांचे खंडन केले.

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अर्धवट ज्ञानाच्या आधारे परब यांनी माझ्यावर आरोप केले. परबांनी आपल्या अकलेचे तारे तोडले, त्यांनी वाळू चोरीचा आरोप केला. अनिल परब यांच्या विरोधात मी हक्कभंग आणणार आहे. अनिल परब यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे. माझ्या आईचा काहीही संबंध नसताना आरोप करण्यात आले, चुकीचे आरोप करून आईला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. अनिल परब यांना माफी मागावी लागेल, असा इशारा योगेश कदम यांनी दिला.

logo
marathi.freepressjournal.in