अजित पवारांची धाकधूक वाढली; अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारेंचा आक्षेप, शिखर बँक घोटाळा प्रकरण

शिखर बँकमधील २५ हजार कोटींच्या घोटाळा प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची धाकधूक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अजित पवारांची धाकधूक वाढली; अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारेंचा आक्षेप, शिखर बँक घोटाळा प्रकरण
(संग्रहित )
Published on

मुंबई : शिखर बँकमधील २५ हजार कोटींच्या घोटाळा प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची धाकधूक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला आक्षेप घेत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांनी गुरुवारी निषेध याचिका दाखल करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला आहे. न्यायालयाने वेळ दिल्याने अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसपासून फारकत घेऊन अजित पवार यांनी शिंदे सरकारशी हातमिळवणी केली आणि शिखर बँक घोटाळ्याच्या तपासाला उलटी दिशा मिळाली. आर्थिक गुन्हे शाखेने कोलांट उडी मारत अधिक तपासात काही नसल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयात अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल केला. त्यावर अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. या घोटाळ्याची गुरुवारी विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी अण्णा हजारे आणि जाधव यांच्या वकिलांनी निषेध याचिका दाखल करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागत सुनावणी तहकूब ठेवण्याची विनंती केली. न्यायालयाने ही विनंती मान्य करून सुनावणी २९ जूनला निश्चित केली.

logo
marathi.freepressjournal.in