समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; एक ठार, ४ जखमी

हा अपघात मंगळवारी दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास झाला
समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; एक ठार, ४ जखमी
Published on

समृद्धी महामार्गावर भरधाव जाणाऱ्या कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार समृद्धी महामार्गावरील एका पुलाच्या कठड्याला धडकली. या अपघातात एक जण ठार झाला आहे, तर ४ जण जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास झाला.

अमरावतीहून अर्पित बनसोडे, दिनेश बनसोडे, सविता बनसोडे, अश्वजीत बनसोडे, सुरेश बनसोडे हे कारने नाशिककडे जात होते. सिंदखेड राजाजवळ चॅनल क्रमांक ३३५.९ वर चालकाला डुलकी लागल्याने त्याचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटले. यामुळे कार महामार्गावरील पुलाच्या कठड्याला धडकली.

logo
marathi.freepressjournal.in