

अमरावती : राज्यात समृद्धी आणण्यासाठी उभारण्यात आलेला भव्य समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून समृद्धी कमी आणि मृत्यूचा सापळाच अधिक ठरला आहे. गुरुवारी सकाळी या महामार्गावर अमरावती जिल्ह्यात खासगी बस आणि कंटेनर ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात तीन जण ठार झाले आहेत. पहाटे पाच वाजता वडोना शिवनी व्हिलेज या नागपूरपासून १५० किमी अंतरावरील ठिकाणी हा अपघात घडला. दोन्ही वाहने मुंबर्इ-नागपूर एक्स्प्रेस-वेच्या एकाच बाजूला होती. बस अहमदनगरहून छत्तीसगढची राजधानी रायपूरला निघाली होती. अपघातात दोन प्रवासी आणि बसचा क्लिनर असे तिघे जण ठार झाले.