आणखी एक महत्वाचा प्रकल्प गुजरातमध्ये हलवला ; विरोधकांचा हल्लाबोल

महाविकास आघाडी सरकारच्या काळात या कंपनीच्या तीन बैठका झाल्या. जवळपास सर्व मुद्यांवर एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे
आणखी एक महत्वाचा प्रकल्प गुजरातमध्ये हलवला ; विरोधकांचा हल्लाबोल
Published on

महाराष्ट्रातील गुंतवणुक आणि उद्योगांना गुजरातला लाटत असल्याचा आरोप भाजपवर विरोधकांकडून केला जात आहे. यासाठी अनेक उदाहरणे नेहमी दिली जातात. आता आणखी एका प्रकल्पामुळे राज्यातील राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्रात येणारा वेदांत-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर उत्पादन उद्योग गुजरातमध्ये हलविण्यात आला आहे. यामुळे राज्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या कंपनीच्या तीन बैठका झाल्या. जवळपास सर्व मुद्यांवर एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जुलै महिन्यात अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अंतिम बैठक घेतली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये हा उद्योग सुरू होणार आहे. 

देशात सेमीकंडक्टर उत्पादन सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने धोरण आखले आहे. आगामी काळात सेमीकंडक्टरची वाढती मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने याबाबत विशेष धोरण आखले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात वेदांतशी झालेल्या चर्चेनुसार पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे सेमीकंडक्टर प्रकल्प सुरू होणार होता. या प्रकल्पामुळे 80 हजार ते एक लाख रोजगार निर्माण होणार आहेत. यातील 30 टक्के रोजगार हा थेट रोजगार असेल. तर, जवळपास 50 टक्के रोजगार अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती झाली असती. वेदांतने तैवानच्या फॉक्सकॉनसोबत भागीदारी केली आहे. या माध्यमातून महाराष्ट्रात तीन टप्प्यात प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित होते. 

logo
marathi.freepressjournal.in