आमदार राजन साळवींच्या मागे पुन्हा चौकशीचा फेरा

जमीन खरेदी आणि हॉटेल मधील भागीदारी बाबत सर्व कागदपत्र घेऊन हजर राहण्याबाबत नोटीस दिली आहे.
आमदार राजन साळवींच्या मागे पुन्हा चौकशीचा फेरा
PM

अलिबाग : शिवसेना (उबाठा) गटाचे राजापूरमधील आमदार राजन साळवी यांच्या मालमत्ते संदर्भात वर्षभरापासून चौकशी सुरू आहे.  आमदार साळवी त्याचे कुटुंब यांची वेळोवेळी चौकशी केल्यानंतर बुधवार २७ डिसेंबर रोजी साळवी यांचा भाऊ, वहिनी आणि पुतण्या यांना रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीला हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. आमदार साळवी यांच्या जमीन खरेदी आणि हॉटेलमधील भागीदारी बाबत चौकशीला बोलवण्यात आले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा आमदार राजन साळवी यांच्या मागे चौकशीचा फेरा सुरू झाला आहे.

आमदार राजन साळवी यांची जून मध्ये चौकशी झाली होती. त्यानंतर आता सहा महिन्यानंतर पुन्हा चौकशीचा फेरा सुरू झाला आहे. रायगड लाच लुचपत विभागाचे पोलिस उप अधीक्षक शशिकांत पाडावे यांनी साळवी यांचे भाऊ दीपक साळवी, वाहिनी अनुराधा दीपक साळवी, पुतण्या दुर्गेश दीपक साळवी याना बुधवारी २७ डिसेंबर रोजी जमीन खरेदी आणि हॉटेल मधील भागीदारी बाबत सर्व कागदपत्र घेऊन हजर राहण्याबाबत नोटीस दिली आहे. त्यामुळे पुन्हा आमदार साळवी यांची कुटुंबासह चौकशीसाठी अलिबागवारी सुरू झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in