ST Buses : २ वर्षांपासून रखडलेल्या एसटी चालक कम वाहक पदाच्या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा

एसटी महामंडळाकडून (ST Buses) पात्र उमेदवारांपैकी ४४८ जणांना नेमणूकीचे पत्र; उर्वरीत पात्र उमेदवारांच्या नेमणूकीला शासनाचा हिरवा कंदील
ST Buses : २ वर्षांपासून रखडलेल्या एसटी चालक कम वाहक पदाच्या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा

दोन वर्षांपासून रखडलेल्या एसटीतील चालक कम वाहक पदासाठीची (ST Buses) भरती प्रक्रिया मार्गी लागली आहे. प्रशिक्षण होऊनही काही जण एसटीत रुजू होऊ शकले नव्हते. कोरोनामुळे ही भरती प्रक्रिया थांबली होती. त्यानंतर रखडलेल्या उर्वरीत पात्र उमेदवारांच्या नेमणूकीला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. एसटीतील २०१९ च्या भरती प्रक्रियेअंतर्गत चालक तथा वाहक पदाच्या भरतीतील पात्र उमेदवारांपैकी ४४८ जणांना नेमणूकीचे पत्र एसटी महामंडळाकडून देण्यात आले आहे.

एसटी महामंडळामध्ये २०१९ मध्ये चालक तथा वाहक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या भरती प्रक्रियेतील १,४३१ पात्र उमेदवारांना यापूर्वीच नेमणूक देण्यात आली आहे. मात्र कोरोनाकाळात २ वर्षे राज्यातील एसटीतील चालक कम वाहक पदासाठीची भरती प्रक्रिया पूर्णपणे रखडली. अलीकडेच राज्य सरकारने एसटी महामंडळाबाबत सकारात्मक निर्णय घेताना ही भरती प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.

यामध्ये चालक तथा वाहक पदाच्या ४ ऑक्टोबरला झालेल्या भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांपैकी २७ पुरूष उमेदवारांना नेमणुकीचे आणि २२ महिलांना सेवापूर्व प्रशिक्षणाचे पत्र मंत्रालयात झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आले होते. त्यानंतर मुंबईत ३ नोव्हेंबरला आयोजित केलेल्या महासंकल्प रोजगार मेळाव्यानिमित्त २०१९ च्या रखडलेल्या भरतीतील ४४८ जणांना एसटीत चालक कम वाहक पदासाठी नियुक्ती पत्र देण्यात आली आहेत.

२२ महिला उमेदवारांना मिळाले सेवापूर्व प्रक्षिणाचे पत्र

एसटी महामंडळाने राबवलेल्या भरती प्रक्रियेत चालक तथा वाहक पदासाठी महिलांकडूनही अर्ज मागविले होते. यामध्ये २०३ महिला उमेदवार लेखी परिक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्या असून यापूर्वीच १४२ महिला उमेदवारांनी अवजड वाहन चालविण्याचा परवाना सादर केला आहे. यापैकी २२ महिला उमेदवारांना सेवापूर्व प्रक्षिणाचे पत्रही देण्यात आले आहे.

पदे भरण्यात आलेले जिल्हे

धुळे - १२५

जळगाव - १२४

नागपूर - ८०

भंडारा - ४७

परभणी - ४५

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in