बँक ऑफ महाराष्ट्रची भांडवल उभारणीच्या ठरावास मान्यता

बँकेची कामगिरी सुधारण्यासाठी व्यवस्थापनाने केलेल्या परिश्रमांचे भागधारकांनी कौतुक केले
बँक ऑफ महाराष्ट्रची भांडवल उभारणीच्या ठरावास मान्यता

देशाच्या सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रची १९वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार, २८ जून रोजी दृकश्राव्य  माध्यमातून पार पडली. सदर सभेमध्ये दिनांक ३१ मार्च २०२२ रोजी समाप्त झालेल्या वित्तीय वर्षाच्या ताळेबंद व नफा तोटा पत्रकास मान्यता देण्यात आली. ३१ मार्च २०२२ रोजीचा ताळेबंद स्वीकारताना भागधारकांना लाभांश घोषित करण्याच्या व भांडवल उभारणी करण्याच्या ठरावास मान्यता दिली. भागधारकांनी बँक व बँकेच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.

बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक ए बी विजयकुमार यांनी बँकेच्या भागधारकांना संबोधित करताना वित्तीय वर्ष २०२१–२२ मधील बँकेची दैदिप्यमान कामगिरी अधोरेखित केली व बँकेने केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. बँकेची कामगिरी सुधारण्यासाठी व्यवस्थापनाने केलेल्या परिश्रमांचे भागधारकांनी कौतुक केले व त्यास पोहोचपावती दिली.

बँकेचे कार्यकारी संचालक आशिष पांडे, संचालक मंडळाचे सदस्य एम के वर्मा, राकेश कुमार, शशांक श्रीवास्तव व सरदार बलजित सिंह तसेच बँकेचे मुख्य वित्तीय अधिकारी, सरव्यवस्थापक, भारत सरकारचे प्रतिनिधी व लेखापरीक्षक सुद्धा सभेमध्ये उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in