सिलिंग कायद्यात सुधारणा करण्यास मान्यता ;महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित सिलिंग कायद्यात सुधारणा करण्यास विधिमंडळाची मान्यता मिळाली आहे.
सिलिंग कायद्यात सुधारणा करण्यास मान्यता
;महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती
PM

नागपूर : बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित सिलिंग कायद्यात सुधारणा करण्यास विधिमंडळाची मान्यता मिळाली आहे. आता खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग-२ म्हणून वाटप केलेल्या जमिनींचा भोगवटा वर्ग-२ करणे शक्य होणार आहे. यामुळे खंडकरी शेतकरी आणि सिलिंग जमिनी मिळालेल्या भूमिहीन, माजी सैनिक, दुर्बल घटकांना लाभ मिळणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

विधिमंडळामध्ये चर्चा होऊन सिलिंग कायद्यातील सुधारणेला मान्यता देण्यात आलेली आहे. सिलिंग कायद्यात केलेल्या सुधारणेमुळे खंडकरी शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनींना वर्ग-१ चा दर्जा मिळणार आहे. त्याचप्रमाणे माजी सैनिक, भूमिहीन, दुर्बल घटक यांना वाटप केलेल्या सिलिंग जमिनी वर्ग-१ करण्यास पात्र ठरणार आहे. सार्वजनिक प्रयोजनासाठी ग्रामपंचायतींकरिता शेती महामंडळाची जमीन उपलब्ध होणार असल्याने शासकीय घरकुल योजना, पाणीपुरवठा योजना, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प इत्यादी प्रलंबित कामे मार्गी लागणार आहेत, असे विखे पाटील यांनी सांगितले.

खंडकरी शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या जमिनी भोगवटादार वर्ग-१ कराव्यात अशी खंडकरी शेतकऱ्यांची दीर्घ कालावधीपासूनची मागणी होती. खंडकरी शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीप्रमाणे खंडकरी जमिनी भोगवटादार वर्ग-१ करण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली. परंतु यासाठी सिलिंग कायद्यात सुधारणा करणे आवश्यक असल्याने विधी आणि न्याय विभाग, वित्त विभाग अशा प्रशासकीय विभागांची मान्यता घेऊन तसेच मंत्रिमंडळ  मान्यतेनंतर हा प्रस्ताव विधीमंडळासमोर मांडण्यात आला. त्यानुसार १५  डिसेंबरला विधानसभेची तर बुधवारी विधानपरिषदेची मान्यता मिळाल्यानंतर कायद्यातील सुधारणा मंजूर झाल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in