राज्यात दंगली भडकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या आशिष शेलारांना अटक करा; काँग्रेसची मागणी

मणिपूरमधील गोहत्येची चित्रफीत कर्नाटक येथील असलल्याचे सांगत दंगली भडकवण्याचा पर्यत्न शेलार यांनी केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
राज्यात दंगली भडकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या आशिष शेलारांना अटक करा; काँग्रेसची मागणी

महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीकडून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. मणिपूरमधील गोहत्येची चित्रफीत कर्नाटक येथील असलल्याचे सांगत दंगली भडकवण्याचा पर्यत्न शेलार यांनी केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. भाजप सातत्याने धार्मिक द्ंगली भडकवण्याचा पर्यत्न करत असून राज्यात अशांतता निर्माण करण्याच प्रयत् करत आहे. भाजपचे आशिष शेलार, नितेश राणे सारखे लोक सातत्याने समाजात द्वेष वाढवणारी भडकावू विधाने करत आहेत. आशिष शेलार यांनी मणिपुर येथील गोहत्येची चित्रफीत दाखून ती दंगल भडकवण्याचा प्रयत्न केला आहे. शेलार यांनी राजकीय फायद्यासाठी दंगल भडकवण्याच प्रयत्न केला असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. आशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

यावेली बोलताना प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, राज्यात भारतीय जनात पक्षाचा जनाधार घटत चालला आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या द्वेषाच्या राजकारणाला जनता कंटाळली आहे. हिमाचलनंतर कर्नाटकात काँग्रेसने भाजपचा दारुण पराभव केला आहे. ते भाजप पचवू शकत नाही. पुढील वर्षभरात राज्यात देखील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यात पराभवाच्या भीतीने आशिष शेलार सारखे लोक धार्मीक मुद्यांचा आधार घेताना दिसत आहे. मणिपुर येथील चित्रफीत दाखवतांना शेलार यांनी खातरजमा करणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी जाणीवपूर्वक ती क्लिप दाखवून काँग्रेसविरोधी वातावरण बनवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप कांगेसकडून करण्यात आला आहे.

राज्यातील सामाजित सलोख्याला गालबोट लाववण्याचे काम सुरु आरे. छत्रपती संभाजीनगर, अकोला,अमरावती, शेगाव, अहमदनगर आणि त्र्यंबकेश्वरमध्ये जाणीवपूर्क वातावरण बिघडवण्याचे काम भाजप आणि संलग्न असलेल्या संघटनांकडून केले जात असल्याचा आरोप अतुल लोंढे यांनी केला आहे. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे फक्त विरोध पक्षच्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर कारवाई करतात, स्वपक्षातील नेत्यांवर कारवाई करत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांची भेट घेत राज्यात दंगली भडकावून राजकीय पोळी भाजण्याचा भाजपचा प्रयत्न असून याला वेळीच आळा घाला, असे काँग्रेसने सांगितले होते. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणाताना दिसत नाही. पोलिसांनी या प्रकारांना लवकर आळा घालावा, महाराष्ट्र काँग्रेस असले प्रकार सहन करणार नाही, असा अशारा लोंडे यांनी दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in