समीर वानखेडे यांची अटक टळली; हायकोर्टाकडून तात्पुरता दिलासा

न्यायालयाने त्यांना अटकेपासून तात्पूरते संरक्षण देत 22 मे पर्यंत अटक न करण्याचे आदेश सीबीआयला दिले आहेत.
समीर वानखेडे यांची अटक टळली; हायकोर्टाकडून तात्पुरता दिलासा

आर्यन खान क्रूझ ड्र्ग्ज प्रकरण देशभर गाजले होते. यानंतर आता या प्रकरणाला वेगळे वळण लागेल आहे. आर्यन खान याला सोडण्यासाठी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी शाहरुख खानकडे 25 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. सीबीआयकडून समीर वानखेडे यांची याप्रकरणी चौकशी सुरु आहे. सीबीआयने या प्रकरणी वानखेडे यांना अटक केली होती, सीबीआयच्या अटकेविरोधात वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हायकोर्टाने समीर वानखेडे यांना अटकेपासून तात्पुरता दिलासा दिला आहे.

समीर वानखेडे यांनी सीबीआयच्या अटकेविरोधात मुंबई उच्चन्यायालयात रीट पिटीशन दाखल केली होती. यावर न्यायालयाने त्यांना अटकेपासून तात्पूरते संरक्षण देत 22 मे पर्यंत अटक न करण्याचे आदेश सीबीआयला दिले आहेत. समीर वानखेडे हे सीबीआयच्या चौकशीला सामोरे जातील. वानखेडे तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप सीबीआयने त्यांच्यावर केला होता. यावर कोर्टाने त्यांना तपासात सहकार्य करण्यास सांगितले आहे. या प्रकरणावर सोमवारी सुनावणी पार पडणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
marathi.freepressjournal.in