वंध्यत्वाच्या जनजागृतीसाठी एआरटी कॉन्क्लेव्हचे पुण्यात आयोजन

कॉन्क्लेव्हमध्ये २०० हून अधिक डॉक्टरांनी आपला सहभाग नोंदवला होता
वंध्यत्वाच्या जनजागृतीसाठी एआरटी कॉन्क्लेव्हचे पुण्यात आयोजन

वंध्यत्वावर मात करीत पालकत्व मिळण्यासाठी उपचार आणि आयव्हीएफ प्रक्रिया तसेच वंध्यत्वाच्या संदर्भातील जनजागृतीसाठी ओऍसिस फर्टीलिटी या देशातील अग्रणीय आयव्हीएफ सेंटरमार्फत वंध्यत्वाच्या संदर्भात अधिक माहिती लोकांपर्यंत पोहचावी या हेतूने एआरटी कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले होते. या कॉन्क्लेव्हमध्ये २०० हून अधिक डॉक्टरांनी आपला सहभाग नोंदवला होता .

या कॉन्क्लेव्हमध्ये प्रसिद्ध स्त्रीप्रसूती विशेष तज्ञ पराग बिन्नीवाले यांसह ओॲसिस फर्टिलिटीचे सायंटिफिक हेड आणि मुख्य चीफ एम्ब्रॉयोलॉजिस्ट डॉ. कृष्ण चैतन्य, ओॲसिस फर्टिलिटीचे सह-संस्थापक आणि मेडिकल डायरेक्टर डॉ. दुर्गा जी. राव, आणि ओॲसिस फर्टिलिटी, पुणेचे क्लिनिकल हेड आणि फर्टिलिटी स्पेशलिस्ट डॉ. निलेश उन्मेश बलकवडे उपस्थित होते. पुण्यातील दोन शाखांसह ओॲसिस फर्टिलिटीचा यशाचा दर सर्वाधिक म्हणजे ७५ टक्के आहे. तंत्रज्ञान, प्रगत विश्लेषणे आणि संशोधनाचे पाठबळ लाभलेले वंध्यत्व उपचार स्त्री आणि पुरुष दोघांनाही पुरवले जात आहेत आणि या सेंटरच्या सहाय्याने हजारो जोडपी पालक बनली आहेत.

या प्रसंगी ओॲसिस फर्टिलिटीचे सह-संस्थापक आणि मेडिकल डायरेक्टर डॉ. दुर्गा जी. राव, ओॲसिस फर्टिलिटीचे सायंटिफिक हेड आणि मुख्य चीफ एम्ब्रॉयोलॉजिस्ट डॉ. कृष्ण चैतन्य आणि ओॲसिस फर्टिलिटी, पुणेचे क्लिनिकल हेड आणि फर्टिलिटी स्पेशलिस्ट डॉ. निलेश उन्मेश बलकवडे यांनीही सविस्तर विचार मांडले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in