मोखाड्यातील निळमातीत कृत्रिम पाणीटंचाई; विहीर ढासळल्याने येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू

तालुक्यातील निळमाती गावच्या विहिरीचा कठडा तुटल्याने गेल्या वर्षभरापासून येथे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्याची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी या गावातील विहिरीची पाहणी केली.
मोखाड्यातील निळमातीत कृत्रिम पाणीटंचाई; विहीर ढासळल्याने येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू

मोखाडा : तालुक्यातील निळमाती गावच्या विहिरीचा कठडा तुटल्याने गेल्या वर्षभरापासून येथे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्याची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी या गावातील विहिरीची पाहणी केली. यावेळी नादुरुस्त विहीर तात्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना निकम यांनी केल्या. तसेच येथील पाणीपुरवठा योजना पुनर्जीवित करणे आणि नवीन विहीर बांधण्याची कामे हाती घेण्याच्या सूचनाही निकम यांनी पाणीपुरवठा उपअभियंता पाध्ये यांना केल्या. त्यामुळे निळमाती येथील पाणी समस्या मिटण्याचे चिन्हे दिसत आहेत.

निळमाती येथील पाण्याची विहीर ढासळल्याने येथील ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू होती. बंधाऱ्याहून शेतीसाठी सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेवर ग्रामपंचायतीने अधिकचा खर्च करून त्याच पाइपलाईनने गावात पाणीपुरवठा सुरू तात्पुरती मलमपट्टी केली आहे; मात्र शाश्वत पाणीपुरवठा करण्यासाठी या गावातील सर्व योजनांची आणि विहिरींची पाहणी जिप अध्यक्ष निकम यांनी केली असून, पाणीपुरवठा अधिकारी, ग्रामसेवक यांना तात्काळ यावर कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत. या नादुरुस्त विहिरीबरोबरच येथील जुनी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे तसेच याठिकाणी नवीन विहिरी बांधण्याच्या सूचना देखील यावेळी निकम यांनी केल्या. यावेळी जिप सदस्य हबीब शेख, सरपंच निरगुडे आदी ग्रामस्थ आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाणीपुरवठा योजना बंद

मोखाडा तालुक्यात सध्या जानेवारी महिन्यातच पाणीटंचाईला सुरवात होत असते. त्यातच अशा अनेक ठिकाणी पाणीपुरवठा योजना बंद पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्यातील पाणीटंचाई गावांचा आकडा वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. नीळमाती येथील विद्यमान परिस्थितीवरून सर्वच ग्रामपंचायत हद्दीतील विहिरी तसेच पाणीपुरवठा योजनांची वस्तुनिष्ठ पाहणी करून त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी आता समोर येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in