जामसंडेकर हत्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा अरुण गवळीला जामीन

कुख्यात गुंड अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी मोठा दिलासा दिला. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची २००७ मध्ये हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
जामसंडेकर हत्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा अरुण गवळीला जामीन
Published on

नवी दिल्ली : कुख्यात गुंड अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी मोठा दिलासा दिला. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची २००७ मध्ये हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तब्बल १८ वर्षे शिक्षा भोगल्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला आहे. अरुण गवळी याने गेल्या काही वर्षांत अनेकदा जामिनासाठी अर्ज केले होते. विविध कारणे दाखवत त्यांनी न्यायालयीन दार ठोठावले. मात्र, प्रत्येक वेळी त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. अखेर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी गवळीचा जामिनाचा अर्ज मंजूर केला असून १८ वर्षांनी तो तुरुंगाबाहेर येणार आहे.

प्रकरण काय?

कमलाकर जामसंडेकर आपल्या घाटकोपरमधील घरी टीव्ही पाहत असताना काही शस्त्रधारी गुंडांनी घरात घुसून त्यांच्यावर २ मार्च २००७ रोजी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात जामसंडेकरांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण मुंबई हादरली होती.

जामसंडेकर यांच्या हत्येच्या काही दिवस आधीच मुंबई महापालिकेची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत अरुण गवळीच्या अखिल भारतीय सेनेचा उमेदवार अजित राणे यांचा जामसंडेकर यांनी केवळ ३६७ मतांनी पराभव केला होता. त्यानंतर जामसंडेकर नगरसेवक म्हणून काम करत होते. मात्र, काही दिवसांतच त्यांची हत्या करण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी अरुण गवळीला जामीन सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी अरुण गवळीला जामीन मंजूर केला, कारण त्याने १७ वर्षे आणि ३ महिन्यांहून अधिक काळ तुरुंगवास भोगला आहे आणि ते ७६ वर्षांचे आहेत. न्यायमूर्ती एम. एम. सुंद्रेश आणि एन. कोटिस्वर सिंग यांच्या खंडपीठाने त्यांच्या दीर्घकालीन तुरुंगवासाचा आणि वयोमानाचा विचार करून जामीन मंजूर केला, जो ट्रायल कोर्टाच्या अटींवर अवलंबून आहे.

logo
marathi.freepressjournal.in