आझाद मैदानात आपचे महाउपवास आंदोलन; अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ समर्थकांचे उपोषण

मुंबईतील आपचे कार्याध्यक्ष रुबेन मस्करेन्हास, सरचिटणीस पायस वर्गीस, उपाध्यक्ष संदीप कटके, संदीप मेहता यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील क्रांतिकारी कवींची देशभक्तीपर गाणी सादर करत महाउपवास केला.
आझाद मैदानात आपचे महाउपवास आंदोलन; अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ समर्थकांचे उपोषण

मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आपच्या मुंबईतील पदाधिकारी आणि समर्थकांनी रविवारी आझाद मैदानात उपोषण करीत आंदोलन केले. येथे दिवसभर कार्यकर्त्यांनी महाउपवास धरून उपोषण केले.

मुंबईतील आपचे कार्याध्यक्ष रुबेन मस्करेन्हास, सरचिटणीस पायस वर्गीस, उपाध्यक्ष संदीप कटके, संदीप मेहता यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील क्रांतिकारी कवींची देशभक्तीपर गाणी सादर करत महाउपवास केला. यावेळी उपोषणकर्त्यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढविला. केजरीवाल यांची अटक म्हणजे त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. देशाच्या लोकशाहीवर हा थेट हल्ला आहे. न्याय, समानता आणि लोकांचा आवाज कायम राखण्यासाठी आम्ही अशा अन्यायाला तोंड देण्यास उभे आहोत, असे मुंबईतील आपचे कार्याध्यक्ष मस्करेन्हास म्हणाले.

लोकसभेत भाजप आणि मोदीचा पराभव अटळ असल्याचे मुद्दाम अशी कारस्थान सुरू असल्याचे मुंबईतील आपचे सरचिटणीस पायस वर्गीस यांनी सांगितले. भाजप सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. निवडणूक बाँड घोटाळ्यामुळे चालवलेले खंडणी रॅकेट आणि व्यवहार उघडकीस आले असल्याने भाजपने केजरीवाल याना अटक केले असे संदीप कटके यांनी आपल्या भाषणात सांगितले. या महाउपवास पोषणास मोठ्या संख्येने आपचे मुंबईतील कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, नवी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आपचे) प्रमुख अरविंद केजरीवाल अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे. ईडीने केलेल्या या कारवाईचे संपूर्ण देशभरात पडसाद उमटले आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यावरील कारवाई सुडबुद्धीतून केल्याचा आरोप आपच्या कार्यकर्त्यांसह विरोधी नेत्यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in