कापसाचे दर वाढल्याने पॉलिस्टर वापरावर भर

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची स्थिती बाबत चर्चा करण्यासाठी येथे दोन दिवसीय ऑल इंडिया कॉटन ट्रेड मिटचे आयोजन करण्यात आले होते.
कापसाचे दर वाढल्याने पॉलिस्टर वापरावर भर

गेल्या वर्षापासून कापसाचे दर वाढले असल्याने देशातील अनेक स्पिनिंग मिल उद्योजकांनी कापसाला पर्याय म्हणून कापड उद्योगात पॉलिस्टरचा वापर वाढवला आहे .त्यामुळे देशांतर्गत कापसाला असलेली मागणीत काही प्रमाणात घट होऊ शकते, त्यामुळे कापसाचे दर हे फार मोठ्या प्रमाणात वाढतील, अशी शक्यता खूप कमी असल्याची माहिती कॉटन असोशिएश्नचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी बोलताना दिली.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची स्थिती बाबत चर्चा करण्यासाठी येथे दोन दिवसीय ऑल इंडिया कॉटन ट्रेड मिटचे आयोजन करण्यात आले होते. देशातील कापूस उद्योगाशी संबंधित उद्योजक, व्यापारी, निर्यातदार यांनी या चर्चासत्रात भाग घेतला. देशभरातून ५०० वर प्रतिनिधी उपस्थित होते. रविवारी या सायंकाळी या चर्चासत्राचा समारोप झाला. यावेळी समारोपप्रसंगी अतुल गणात्रा बोलत होते. शनिवारी चर्चासत्रास आलेल्या प्रतिनिधींनी थेट शेतावर जाऊन कापसाची पीक पाहणी केली.

गेल्या वर्षी कापसाला चांगला भाव मिळाल्याने यंदा देशभरात कापसाची लागवड वाढली होती, त्यामुळे यंदा भरतात ३ कोटी ६५ लाख गाठींचे उत्पादन होण्याची शक्यता गणात्रा यांनी व्यक्त केली; मात्र सध्या देशाच्या अनेक भागात अतिवृष्टीहोत असल्याने तसेच अजून काही दिवस असाच पाऊस सुरू राहिल्यास कापसाच्या उत्पादनात २० ते २५ टक्के घट येऊ शकते, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. स्पिनिंग उद्योजकांनी पॉलिस्टरचा पर्याय स्वीकारला असतानाच सरकीला मागणीदेखील घटली आहे त्यामुळे कापसाच्या मागणीवर परिणाम होऊ शकतो, असे गणात्रा यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय बाजारा बाबत बोलताना आर्थिक मंदीमुळे बांगलादेशात कापसाच्या निर्यातीला संधी नसल्याचे सांगत अमेरिकेत दुष्काळ, पाकिस्तानात महापूर यामुळे या दोन्ही देशातील कापसाचे उत्पादन कमी होणार आहे त्यामुळे भारताच्या कापसाला मागणी वाढेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त करत यंदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नऊ हजारापर्यंत भाव मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमास महाराष्ट्र जिनिंग असोसिएशनचे अध्यक्ष भूपेंद्र राजपाल, वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त उषा पोळ, बजाज स्टीलचे ललित कलंत्री, खान्देश जिनिंगचे असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जैन, सीसीआयचे अर्जुन दवे विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in