
राज्यात उष्माघातामुळे मृत पावलेल्यांचा आकडा वाढत असून गेल्या दोन महिन्यात तब्बल २५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात राज्याची उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरात उष्माघातामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. एप्रिल महिन्यात नागपूरमध्ये उष्माघाताने ९ लोकांचा मृत्यू झाला. उष्माघाताच्या बळींची गेल्या आठ वर्षांतील ही उच्चांकी नोंद आहे.