
मुंबई : सार्वजनिक ठिकाणे, गडकिल्ले येथे दारू पिऊन राजरोसपणे धिंगाणा घातला जातो. रायगड किल्ला हिंदवी स्वराज्याचे प्रतीक असून त्याठिकाणी दारू पिऊन धिंगाणा घातला जातो. दारू पिणे न पिणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र सार्वजनिक ठिकाणी, गडकिल्ले येथे दारूबंदी करत महाराष्ट्राची संस्कृती जोपासणे गरजेचे आहे. यासाठी विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत सन २०२५ चे महाराष्ट्र दारू बंदी अशासकीय विधेयक मांडले. यावर उत्तर देताना मंत्री आशीष शेलार म्हणाले की, समिती स्थापन करण्यात येईल आणि सहा महिन्यांत रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
महाराष्ट्राची भूमी साधूसंतांची आहे. मात्र महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी दारू पिऊन धिंगाणा घालताना लोक दिसतात. अमेरिकेत सार्वजनिक ठिकाणी दारू पिण्यास बंदी आहे. मात्र महाराष्ट्रात राजरोसपणे दारू पिऊन धिंगाणा घातला जातो, असे मुनगंटीवार म्हणाले.