उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेवर आशिष शेलारांची 'महा'टीका; महाभारताचा दाखला देत म्हणाले...

आशिष शेलार यांनी 'महाभारताचा' दाखला देत केलेल्या 'महा'ट्विटमधून ठाकरेंनी घेतलेल्या महापत्रकार परिषदवर निशाणा साधाला आहे.
उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेवर आशिष शेलारांची 'महा'टीका; महाभारताचा दाखला देत म्हणाले...

विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारी रोजी शिवसेना आमदार अपात्रेबाबत निकाल दिला. नार्वेकरांनी दिलेल्या निकालानंतर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी हा खटला जनतेच्या न्यायालयात नेत वरळी येथे महापत्रकार परिषदेचे आयोजन होते. ठाकरे यांच्या महापत्रकार परिषदेवर भाजप आमदार आशिष शेलार यांनी त्यांच्यावर शेलक्या शब्दांत 'महा'टीका केली आहे.

शेलार यांनी शिवसेनेबाबत सुरु असलेला वाद, गेल्या पाच वर्षात भाजप आणि शिवसेना यांच्यात आलेला दुरावा, उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर केलेला दावा, यानंतर झालेली महाविकास आघडीची स्थापना आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची दररोज सकाळी न चुकता होणारी पत्रकार परिषद यासर्व बाबींची सांगड घालत 'महाभारताचा' दाखला देत केलेल्या 'महा'ट्विटमधून ठाकरेंनी घेतलेल्या महापत्रकार परिषदवर निशाणा साधाला.

आशिष शेलार यांनी केलेले ट्विट जसेच्या तसे-

"दुर्योधन आणि शकुनी मामाच्या धोका आणि "महा"कपटामुळेच "महा"भारताचे युद्ध झाले...म्हणून पांडवांच्या हातून सर्व कौरवांचा "महा"नाश झाला.... तसेच, नेहमी एक खोटं लपवण्यासाठी "महा" खोटे बोलावे लागते! मुख्यमंत्रीपदासाठी "महा"कपट, "महा"धोका केला नसता. अडीच वर्षे..असं काही ठरलं नसताना ही "महा"खोटं बोलला नसता...रोज सकाळी खोटं बोलणाऱ्या "महा"शकुनीला आवरले असते...तर..अशी "महा"पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली नसती. जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो रे ईश्वर!! जय श्रीराम!!" असे शेलार यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

शेलार यांचे हे ट्विट चर्चेचा विषय ठऱत आहे.

logo
marathi.freepressjournal.in