भाजपकडून राज्यसभेवर जाणार? काँग्रेस का सोडली? राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया

"मी काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा अध्यक्षांना भेटून दिला आहे. जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत मी काँग्रेसचे काम केलेले आहे. यापुढील राजकीय दिशेबाबत...
भाजपकडून राज्यसभेवर जाणार? काँग्रेस का सोडली? राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया

"मी काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा अध्यक्षांना भेटून दिला आहे. जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत मी काँग्रेसचे काम केलेले आहे. यापुढील राजकीय दिशेबाबत एक-दोन दिवसांत निर्णय घेईल. अद्याप त्याबाबत ठरवलेले नाही. मला त्यासाठी काही अवधी लागेल. दोन दिवसांमध्ये मी माझी पुढील राजकीय भूमिका काय असेल ते निश्चित करेल", असे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले. काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली.

"आज मी काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा अध्यक्षांना भेटून दिला आणि त्यानंतर मी काँग्रेस वर्किंग कमिटी, विधीमंडळ काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा, काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मी काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं आहे. मला कुणाबद्दलही तक्रार करायची नाही आणि माझ्या मनात कुणाहीबद्दल व्यक्तिगत वेगळी भावना नाही", असे चव्हाण म्हणाले.

दोन दिवसांत राजकीय भूमिका स्पष्ट करणार

जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत मी काँग्रेसचे काम केलेले आहे. यापुढील राजकीय दिशेबाबत एक-दोन दिवसांत निर्णय घेईल. अद्याप त्याबाबत ठरवलेले नाही. मला त्यासाठी काही अवधी लागेल. दोन दिवसांमध्ये मी माझी पुढील राजकीय भूमिका काय असेल ते निश्चित करेल.

भाजपकडून राज्यसभेवर जाणार का?

मला भाजपची कार्यप्रणाली माहित नाही. भाजपमध्ये जाण्याचा कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन दिवसांत राजकीय भूमिका स्पष्ट करेन.

काँग्रेस सोडण्याचं कारण काय, काँग्रेसवर नाराजी का?

प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे असं काही नाही. मी पहिल्यापासून अगदी माझ्या जन्मापासून काँग्रेसचं काम केलं आहे. आता अन्य पर्याय पाहिले पाहिजेत असं मला वाटलं आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे, याच्या पलीकडे काही नाही. मला कुठल्याही पक्षांतर्गत गोष्टीची जाहीर वाच्यता करायची नाही. कुणाची उणीदुणी मला काढायची नाहीत. तो माझ्या स्वभावाचा भाग नाही. मी सांगितलं की मी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि मला वाटलं की आता वेगळ्या पर्यायाचा विचार करायला पाहिजे, एवढीच माझी भूमिका आहे.

काँग्रेसचे अन्य आमदार सोबत आहेत का?

एकाही काँग्रेस आमदारासोबत अद्याप बोललेलो नाही, माझा तसा हेतू नाही.

मविआमध्ये जागावाटपांचा निर्णय संथगतीने

जागावाटपाचा निर्णय पाहिजे तशा वेगात होत नाहीये, हे मलाही जाणवतंय...मला आता यावर बोलायचा अधिकार नाहीये...पण हे जर वेगाने झाले असते तर निश्चितपणे महाविकास आघाडीला फायदा झाला असता.

मी सुद्धा काँग्रेससाठी खूप केलं

अशोक चव्हाणांना पक्षाने खूप दिलं, पण अशोक चव्हाणांनीही पक्षासाठी खूप केलं...या दोन्ही गोष्टी आहेत. अशोक चव्हाण जिथे राहिले ते प्रामाणिकपणे राहिले. पक्षाने मला मोठं केलं आणि मी सुद्धा पक्षासाठी कधी काही कमी पडू दिलं नाही, असंही अशोक चव्हाण अखेरीस म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in