अशोक चव्हाण आल्याने  नांदेडमध्ये भाजपला ‘बूस्टर डोस’,  प्रताप पाटील चिखलीकर यांनी भरला उमेदवारी अर्ज

अशोक चव्हाण आल्याने नांदेडमध्ये भाजपला ‘बूस्टर डोस’, प्रताप पाटील चिखलीकर यांनी भरला उमेदवारी अर्ज

विरोधी पक्षांनी येथे रॅली काढली आणि त्यांचा एकच अजेंडा होता आणि तो म्हणजे अशोक चव्हाण. त्यांनी विकास आणि इतर मुद्द्यांवरही बोलावे. आम्हाला देश दुसऱ्याच्या हातात देऊन प्रयोग करायचे नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विकासाच्या मार्गावर वेगाने नेले आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले.

छत्रपती संभाजीनगर : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या समावेशाने नांदेडमध्ये भाजपला ‘बूस्टर डोस’ मिळाला आहे, असे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सांगितले. विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नांदेडमध्ये भाजपच्या सभेमध्ये फडणवीस बोलत होते.

२०१९ च्या निवडणुकीत चिखलीकर यांनी त्यावेळी काँग्रेससोबत असलेल्या चव्हाण यांचा ४० हजारापेक्षा अधिक मतांनी पराभव केला होता.चव्हाण विरोधात निवडणूक लढवत असताना चिखलीकरांना ४३ टक्के मते मिळाली होती. आता चव्हाण आमच्यासोबत आहेत आणि चिखलीकरांची मतांची टक्केवारी त्यामुळे ५० टक्क्यांच्या वर जाईल, असे स्पष्ट करीत चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने नांदेडमध्ये भाजपला बूस्टर डोस मिळाला असल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.

फडणवीस म्हणाले की, चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये असताना नागपूर-मुंबई समृद्धी एक्स्प्रेस-वे योजनेला पाठिंबा दिला होता, त्यावेळी त्यांच्या पक्षाचे सहकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आणि उद्धव ठाकरेंनी विरोध केला होता. जेव्हा नांदेडला समृद्धी द्रुतगती मार्गाने जोडण्याची कल्पना आली, तेव्हा आम्ही ते करण्याचा निर्णय घेतला. मराठवाडा आणि विदर्भाचा विकास करण्याचा आमचा अजेंडा आहे. आता नांदेड आणि संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाला गती मिळेल, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

चव्हाण म्हणाले की, मी आणि अजित गोपचाडे (राज्यसभेत) आणि नांदेड, हिंगोली आणि लातूरचे खासदार मराठवाड्याच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करू. नांदेडला पाच खासदारांची संधी खूप दिवसांनी आली आहे, असा दावा अशाेक चव्हाण यांनी केला.

मोदींनी देशाला विकासाच्या मार्गावर नेले

विरोधी पक्षांनी येथे रॅली काढली आणि त्यांचा एकच अजेंडा होता आणि तो म्हणजे अशोक चव्हाण. त्यांनी विकास आणि इतर मुद्द्यांवरही बोलावे. आम्हाला देश दुसऱ्याच्या हातात देऊन प्रयोग करायचे नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विकासाच्या मार्गावर वेगाने नेले आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले.

अशोक चव्हाण माझ्यापेक्षा ज्येष्ठ

चिखलीकरांचे स्वागत करताना, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, त्यांनी नांदेडच्या प्रत्येक घटकासाठी काम केल्यामुळे लोकांनी त्यांना मतदान केले पाहिजे. चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींचे नेतृत्व स्वीकारले आहे. ते माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करेन, असे प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in