नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओबाबत अशोक चव्हाण यांची मोठा मागणी ; म्हणाले, "हा स्टुडिओ..."

अशोक चव्हाण यांनी देसाई यांच्या आत्महत्येवर शोक व्यक्त केला असून त्यांच्या एनडी स्टुडिओ संदर्भात मोठा मागणी केली आहे.
नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओबाबत अशोक चव्हाण यांची मोठा मागणी ; म्हणाले, "हा स्टुडिओ..."

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येने सर्वांना धक्का बसला आहे. देसाई यांनी काल (२ ऑगस्ट) रोजी त्यांच्या कर्ज एथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. देसाई यांनी कर्जामुळे आत्महत्या केल्याच सांगितलं जात आहे. यांसदर्भात आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी विधिमंडळात एनडी स्टुडिओ सरकारतर्फे टेकओव्हर करण्याची मागणी केली आहे.

राज्याच्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात आज कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येसंदर्भात चर्चा सुरु असताना काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओ सरकारने टेक ओव्हर करावा, अशी मागणी केली. यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, देसाई यांनी आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं ही बातमी खूप वाईट आहे. त्यांनी बॉलिवूडमध्ये आपली छाप उमटवली. त्यांनी ऑडिओ क्लिपमध्ये काही पुरावे दिले आहेत. त्यांच्यावर असलेल्या कर्जामुळे वसुलीसाठी त्यांच्यामागे लोक लागली होती, असं देखील त्यात आहे. या सर्व गोष्टींची चौकशी व्हायला हवी, असंही चव्हाण म्हणाले.

ते पुढे बोलताना म्हणाले की, शासनाने एनडी स्टुडिओ टेकओव्हर करावा. त्यावर कर्ज आहे. इतर लोकांनी लिलाव लावण्यापेक्षा तो स्टुडिओ सरकारने घ्यायला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. चव्हाण यांनी केलेल्या मागणीला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मराठी माणसाला अभिमान वाटावा असं काम देसाई यांनी केलं होतं. अनेक ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रोक्टवर काम केलं. दिल्लीतील चित्ररथ नेहमी तेच करायचे. हरहुन्नरी कलावंत आपल्याला सोडून गेले. त्यांच्यावर काही कर्ज झालं होतं ही गोष्ट खरी आहे. या संदर्भात चौकशी सुरु आहे. त्यांच्यावर कोणता दबाव होता का याची चौकशी करण्यात येईल. कायदेशीर बाबी तपासून नितीन देसाई यांची आठवण म्हणून हा स्टुडिओ आपल्याला तसाच ठेवून त्याचं संवर्धन करता येईल का? या कायदेशीर बाबी तपासण्यात येतील, असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in