ओबीसी कार्यकर्त्यांवर अशोक चव्हाणांचा दबाव; काँग्रेस कमिटी ओबीसी सेलचे अध्यक्ष भानुदास माळी यांचा आरोप

लवकरच प्रदेशाध्यक्ष नाना पेटोले यांच्या उपस्थितीत नांदेडला ओबीसींचा मेळावा घेण्यात येणार आहेत.
ओबीसी कार्यकर्त्यांवर अशोक चव्हाणांचा दबाव; काँग्रेस कमिटी ओबीसी सेलचे अध्यक्ष भानुदास माळी यांचा आरोप

नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काँग्रेस पक्षात असताना ओबीसी विभागातील कार्यकारिणी जाहीर करू दिली नाही. कार्यकर्त्यांना स्पष्ट बोलू देत नव्हते, कार्यक्रम घेऊ देत नव्हते. त्यांच्या कार्यक्रमांना गैरहजर रहात होते, हा त्यांचा दबावा होता, असा आरोप करत त्यांच्यामुळे आम्हाला आमची टिम व्यवस्थीत उभी करता आली नाही, अशी टीका काँग्रेस कमिटी ओबीसी सेलचे अध्यक्ष भानुदास माळी यांनी रविवारी (दि. २५) पत्रकार परिषदेत केली.

ओबीसी सेलचे अध्यक्ष भानुदास माळी नांदेड दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान, शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस नंदकुमार कुंभार, जिल्हाध्यक्ष गोविंद नागेलीकर, विजय राऊत, धनराज राठोड, कांचन चाटे, वसंत मुंडे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना माळी म्हणाले, ओबीसीं कार्यकर्ते आज पेटून उठले आहेत. त्यांना आता स्वतंत्रपणे काम करता येणार आहे. ओबीसींची जिल्हा, शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. लवकरच चार जणांची समिती नांदेडला येणार असून, तीन नावे सुचविणार आहे. यात काँग्रेस पुजकांनाच पदांवर संधी दिली जाणार आहे. जिल्ह्यात काँग्रेसला बळकट करण्यासाठी आगामी काळात संघटनात्मक बदल, बैठका, मेळावे, दौरे यावर भर देण्यात येणार आहे. लवकरच प्रदेशाध्यक्ष नाना पेटोले यांच्या उपस्थितीत नांदेडला ओबीसींचा मेळावा घेण्यात येणार आहेत. यात केंद्रातील नेत्यांना बोलविण्यात येणार आहे, असेही ओबीसी सेलचे अध्यक्ष भानुदास माळी यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in