भोंदू अशोक खरात प्रकरण : खरातचा माज उतरला, कोठडीत ढसाढसा रडला

भोंदूबाबा खरातला बुधवारी एका प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याला गुरुवारी सुनावणीसाठी पुन्हा न्यायालयात हजर करावे असा आदेश जिल्हा सत्र न्यायालयाने दिला आहे.
भोंदू अशोक खरात प्रकरण : खरातचा माज उतरला, कोठडीत ढसाढसा रडला
भोंदू अशोक खरात प्रकरण : खरातचा माज उतरला, कोठडीत ढसाढसा रडला
Published on

नाशिक : भोंदूबाबा खरातला बुधवारी एका प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याला गुरुवारी सुनावणीसाठी पुन्हा न्यायालयात हजर करावे असा आदेश जिल्हा सत्र न्यायालयाने दिला आहे. दरम्यान अटक झाली त्यावेळी आरंभी पोलिसांशी अरेरावीने वागणाऱ्या खरातचे अवसान गळाले असून तो कोठडीत दोनतीन वेळा ढसढसा रडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

भोंदू अशोक खरात प्रकरण : खरातचा माज उतरला, कोठडीत ढसाढसा रडला
अशोक खरात कुटुंबाभोवती SITचा फास; जमीन गैरव्यवहारप्रकरणी मुलगा ताब्यात, पत्नी कल्पना खरात फरार

सध्या खरातविरुद्ध बारा गुन्हे दाखल असून महिला अत्याचाराची आठ तर फसवणुकीची चार प्रकरणे आहेत. या सर्वच प्रकरणांची चौकशी वेगाने चालू असून त्यापैकी एका प्रकरणात त्याला आठ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तिची मुदत संपल्यानंतर बुधवारी त्याला पुन्हा सुनावणीसाठी हजर करण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडीओ कॉन्फरन्स यंत्रणेमार्फत ही हजेरी लावली गेली. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी देण्याचा निर्णय घेतला गेला. आता त्याला मध्यवर्ती कारागृहात ठेवले जाणार आहे. मात्र त्याचा पुन्हा ताबा घेण्यासाठी विशेष तपास पथकाचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने इतर गुन्ह्यांचा तपास वेगाने करीत असून त्यामध्ये पोलीस कोठडी मागितली जाण्याची शक्यता आहे.

भोंदू अशोक खरात प्रकरण : खरातचा माज उतरला, कोठडीत ढसाढसा रडला
भोंदू अशोक खरात प्रकरण : अश्लील व्हिडिओ व्हायरल करणे महागात, गुन्हा दाखल

दरम्यान, या प्रकरणातील अधिकाधिक पीडित पुढे येत असून आतापर्यंत ११ महिलांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत. त्यापैकी अनेकींचे शारीरिक शोषण केल्याचे आरोप असून धाक दाखवून मालमत्ता व जमिनी बळकावल्याच्याही तक्रारी आहेत. तपासाचा फास आवळला जाऊ लागल्याने खरातचा माज उतरला आहे. आरंभी तो पोलिसांशी उर्मटपणे वागत होता व तळतळाट करीत होता. पण आता तो पूर्णपणे खचला आहे.

logo
marathi.freepressjournal.in