भोंदू अशोक खरात प्रकरण : प्रतिभा चाकणकर यांना नोटीस

भोंदू अशोक खरात प्रकरणाशी संबंधित असलेल्या समता पतसंस्थेतील संशयास्पद आर्थिक व्यवहारप्रकरणी शिर्डी पोलिसांनी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांना नोटीस बजावली आहे.
भोंदू अशोक खरात प्रकरण : प्रतिभा चाकणकर यांना नोटीस
भोंदू अशोक खरात प्रकरण : प्रतिभा चाकणकर यांना नोटीस
Published on

अहिल्यानगर : भोंदू अशोक खरात प्रकरणाशी संबंधित असलेल्या समता पतसंस्थेतील संशयास्पद आर्थिक व्यवहारप्रकरणी शिर्डी पोलिसांनी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे पोलिसांनी रुपाली चाकणकर यांच्या चौकशीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. पतसंस्थेतील प्रतिभा चाकणकर व त्यांच्या मुलांच्या खात्यांवरून तब्बल २ कोटी ४० लाख रुपयांचा व्यवहार झाल्याची बाब पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने पोललीसांनी हे पाऊल उचलले आहे.

भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणी खरातविरोधात शिर्डीत बेकायदा सावकारी व आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील समता पतसंस्थेत त्याच्याशी संबंधित अनेक संशयास्पद खाती आढळली आहेत. त्यात प्रतिभा चाकणकर व त्यांच्या मुलांच्या नावे असणाऱ्या ४ खात्यांचाही समावेश आहे. या खात्यांवरून तब्बल २ कोटी ४० लाख रुपयांचा व्यवहार झाल्याची बाब पोलिस तपासात निष्पन्न झाली आहे.

भोंदू अशोक खरात प्रकरण : प्रतिभा चाकणकर यांना नोटीस
भोंदू खरातचा पाय खोलात; व्यवहार केल्यापासून मुलगा बेपत्ता : स्थानिक शेतकऱ्याच्या आरोपानंतर पाथर्डीत संतापाची लाट

५ दिवसांत नोंदवावा लागणार जबाब

प्रतिभा चाकणकर व त्यांच्या मुलांच्या या आर्थिक व्यवहाराचा सावकारी व्यवसायाशी काही संबंध आहे का? तसेच हे पैसे कुणाचे आहेत? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांना नोटीस बजावली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांच्या दोन वेगवेगळ्या पत्त्यांवर पोस्टाद्वारे नोटीस बजावली आहे. नोटीस मिळाल्यापासून ५ दिवसांच्या आत त्यांना चौकशी व जबाब नोंदवण्यासाठी शिर्डी पोलिस ठाण्यात हजर राहावे लागणार आहे.

भोंदू अशोक खरात प्रकरण : प्रतिभा चाकणकर यांना नोटीस
SIT चौकशीला रुपाली चाकणकरांची दांडी

पतसंस्थेच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा?

अशोक खरात याने या पतसंस्थेच्या माध्यमातून आपला काळा पैसा पांढरा केल्याचा संशय आहे. कारण, समता पतसंस्थेत खरात नॉमिनी असलेली १०० हून अधिक खाती आढळली आहेत. ही खाती ५७ वेगवेगळ्या लोकांच्या नावे आहेत. त्यावरून ६० कोटींहून अधिकचा व्यवहार झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत ३३ खातेदारांची चौकशी पूर्ण झाली आहे. यापैकी बहुतांश लोकांना या पतसंस्थेत आपले खाते असल्याचेच माहिती नाही असा जबाब त्यांनी दिला आहे. आता पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांनाही चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. त्यामुळे त्यांचा जबाब या प्रकरणाच्या तपासातील एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. दुसरीकडे, जगदंब पतसंस्थेतही खरात नॉमिनी असलेली ३२ खाती आढळली आहेत. त्यामुळे ही खाती व त्यावरून झालेल्या व्यवहारांचीही पोलिस कसून चौकशी करत आहेत.

भोंदू अशोक खरात प्रकरण : प्रतिभा चाकणकर यांना नोटीस
भोंदूबाबा अशोक खरातवर ED चा गुन्हा दाखल; कोट्यवधींच्या अफरातफरीचा संशय

रुपाली चाकणकरांचा पाय खोलात

उल्लेखनीय बाब म्हणजे भोंदू अशोक खरातशी असणाऱ्या कथित संबंधांवरून रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यानंतर त्यांना सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदावरही पाणी सोडावे लागले आहे. खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने या प्रकरणी रुपाली चाकणकर यांना समन्स बजावल्याची माहिती आहे. पण त्याची पुष्टी होऊ शकली नाही. तूर्त सध्याचा घटनाक्रम पाहता त्यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in