अशोक खरात प्रकरण : महिलेवर अत्याचारप्रकरणी ८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात याचे पाय विविध गुन्ह्यांप्रकरणी अधिक खोलवर जात आहेत.
भोंदू खरातचा पाय खोलात; व्यवहार केल्यापासून मुलगा बेपत्ता : स्थानिक शेतकऱ्याच्या आरोपानंतर पाथर्डीत संतापाची लाट
भोंदू खरातचा पाय खोलात; व्यवहार केल्यापासून मुलगा बेपत्ता : स्थानिक शेतकऱ्याच्या आरोपानंतर पाथर्डीत संतापाची लाट
Published on

नाशिक : महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात याचे पाय विविध गुन्ह्यांप्रकरणी अधिक खोलवर जात आहेत. खरातवच्या जीवाला धोका असल्याने गुरूवारची न्यायालयीन सुनावणी अत्यंत कडक बंदोबस्तात आणि ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे पार पडली. विशेष तपास पथकाने मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने खरातला ८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

भोंदू खरातचा पाय खोलात; व्यवहार केल्यापासून मुलगा बेपत्ता : स्थानिक शेतकऱ्याच्या आरोपानंतर पाथर्डीत संतापाची लाट
भोंदू खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; खरातच्या फरार पत्नीचा शोध सुरूच

तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी सुरक्षेच्या कारणास्तव खरातला न्यायालयात आणणे जोखमीचे असल्याचे अर्जाद्वारे कळवले होते. न्यायालयाने ही विनंती मान्य केल्याने कोर्ट रूममध्ये चार मोठे स्क्रीन बसवून सुनावणी पार पडली.

भोंदू खरातचा पाय खोलात; व्यवहार केल्यापासून मुलगा बेपत्ता : स्थानिक शेतकऱ्याच्या आरोपानंतर पाथर्डीत संतापाची लाट
अशोक खरात कुटुंबाभोवती SITचा फास; जमीन गैरव्यवहारप्रकरणी मुलगा ताब्यात, पत्नी कल्पना खरात फरार

तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे की, खरात हा पीडितेच्या नातेवाईकांकडे वारंवार आधार कार्ड आणि पॅन कार्डची मागणी करत होता. याद्वारे तो संबंधितांची मालमत्ता स्वतःच्या नावावर हडपण्याच्या बेतात होता का? या दिशेने आता ‘एसआयटी’ने तपासाची चक्रे फिरवली आहेत. आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचा दावाही सरकारी पक्षाने केला.

logo
marathi.freepressjournal.in