खरातने उरणमध्ये ४ कोटींची जमीन घेतली फक्त ५८ लाखांत; अटकेच्या दिवशीच व्यवहाराची नोटीस प्रसिद्ध, कोठडीत फेरफार नोंदही मंजूर

अशोक खरातच्या तपासादरम्यान आणखी एक नवीन ‘कांड’ समोर आले आहे. खरातने नवी मुंबईजवळील उरणमधील चाणके येथे बाजारभाव ३ ते ४ कोटी रुपये असलेली जमीन अवघ्या ५८.५० लाख रुपयांत खरेदी केल्याचे उघड झाले आहे.
खरातने उरणमध्ये ४ कोटींची जमीन घेतली फक्त ५८ लाखांत; अटकेच्या दिवशीच व्यवहाराची नोटीस प्रसिद्ध, कोठडीत फेरफार नोंदही मंजूर
खरातने उरणमध्ये ४ कोटींची जमीन घेतली फक्त ५८ लाखांत; अटकेच्या दिवशीच व्यवहाराची नोटीस प्रसिद्ध, कोठडीत फेरफार नोंदही मंजूर संग्रहित छायाचित्र
Published on

उरण : अशोक खरातच्या तपासादरम्यान आणखी एक नवीन ‘कांड’ समोर आले आहे. खरातने नवी मुंबईजवळील उरणमधील चाणके येथे बाजारभाव ३ ते ४ कोटी रुपये असलेली जमीन अवघ्या ५८.५० लाख रुपयांत खरेदी केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, ज्या दिवशी (१७ मार्च) खरातला अटक झाली, त्याच दिवशी या व्यवहाराची नोटीस प्रसिद्ध झाली होती आणि तो पोलीस कोठडीत असताना १३ एप्रिलला या जमिनीची फेरफार नोंदही मंजूर झाली. यावरून प्रशासकीय स्तरावर त्याला कोणाचे पाठबळ होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अशोक खरात प्रकरणाचे धागेदोरे आता राजकीय आणि सहकार क्षेत्रापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणामुळे समता पतसंस्थेचे अध्यक्ष काका कोयटे यांना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. खरातचे या संस्थेत अनेक बेनामी खाती असल्याचे आणि त्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप होत आहेत.

पोलीस कोठडी आणि सहावा गुन्हा

पाचव्या गुन्ह्यातील कोठडी: खरातची पाचव्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी शुक्रवारी संपली असून त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. महिला अत्याचाराच्या सहाव्या गुन्ह्यात पोलिसांनी पुन्हा खरातचा ताबा घेतला असून, अधिक तपासासाठी पुन्हा पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे.

खरातने उरणमध्ये ४ कोटींची जमीन घेतली फक्त ५८ लाखांत; अटकेच्या दिवशीच व्यवहाराची नोटीस प्रसिद्ध, कोठडीत फेरफार नोंदही मंजूर
भोंदू अशोक खरातचा कोठडीतील मुक्काम वाढला; पाचव्या गुन्ह्यात ५ दिवसांची पोलीस कोठडी

तरुणीवर चार वेळा बलात्कार

दैवी चमत्काराचा खोटा दावा करून आणि वैयक्तिक समस्या दूर करण्याचे आमिष दाखवून खरातने एका तरुणीवर चार वेळा बलात्कार केल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. या गुन्ह्यात तो पीडितेला गुंगीकारक औषध मिसळलेले पाणी पाजायचा, असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. हे औषध नेमके कोणते होते आणि धार्मिक विधींच्या नावाखाली त्याने आणखी किती आर्थिक फसवणूक केली, याचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी चार दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती.

खरातने उरणमध्ये ४ कोटींची जमीन घेतली फक्त ५८ लाखांत; अटकेच्या दिवशीच व्यवहाराची नोटीस प्रसिद्ध, कोठडीत फेरफार नोंदही मंजूर
अशोक खरात प्रकरणातील साक्षीदार जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू; अपघातात पत्नीही ठार, मुलगा गंभीर जखमी

सहाव्या गुन्ह्यात २६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

दुसरीकडे, आरोपीच्या वकिलांनी या पोलीस कोठडीला तीव्र विरोध दर्शवला. सर्व गुन्ह्यांचे स्वरूप सारखेच असताना पुन्हा पुन्हा तपासाच्या नावाखाली आरोपीला कोठडीत ठेवण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पोलीस कोठडीत केवळ आरोपीला बसवून ठेवण्याने तपासात काय साध्य होणार आहे, असे म्हणत त्यांनी कोठडीची मागणी फेटाळण्याची विनंती केली. मात्र, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने गांभीर्य लक्षात घेऊन अशोक खरातला सहाव्या गुन्ह्यात 26 एप्रिलपर्यंत, म्हणजेच तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता पुढील तीन दिवस खरातचा मुक्काम पोलीस कोठडीतच असणार असून, यादरम्यान त्याच्या आणखी काही काळ्या कारनाम्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in