माहूर गडावर अष्टमीचा होम हवन सोहळा; श्री रेणुका देवी संस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी केली पूजा

श्री रेणुका देवीच्या अष्टमीच्या होम-हवन सोहळ्यास विशेष महत्त्व आहे
माहूर गडावर अष्टमीचा होम हवन सोहळा;
श्री रेणुका देवी संस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी केली पूजा

नांदेड : माहूर गडावरील श्री रेणुका देवी मंदिरासमोर असलेल्या ऐतिहासिक होमाची रविवारी सायंकाळी अष्टमीच्या शुभमुहूर्तावर श्री रेणुका देवी संस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी सपत्नीक होम हवन पूजा केली. यावेळी विश्वस्त,पुजारी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री रेणुका देवीच्या अष्टमीच्या होम-हवन सोहळ्यास विशेष महत्त्व आहे. होम हवन विधी सायंकाळी आठ वाजता सुरुवात झाली. सुरुवात झाली, तर तर रात्री दीड वाजता विधी संपन्न झाला. विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त संजय कानव, उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी दादासाहेब सिनगारे, विश्वस्त अरविंद देव, आशिष जोशी, पुजारी भवानीदास भोपी, पुजारी शुभम भोपी,उपस्थित होते. पौरहित्य निलेश केदार गुरुजी व त्यांच्या विद्यार्थी तसेच पुजारी रवींद्र कानव यांनी केले.

रविवारी सायंकाळी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खा. हेमंत पाटील, राजश्रीताई हेमंत पाटील,आमदार मेनपल्ली हनुमंत राव, बासरचे जि.प. सदस्य रमेश, निजामाबाद मंडळ अध्यक्ष माणिकेश्वर राव, सुदर्शन राव, पांडुरंग राव, पुरुषोत्तम राव,अन्वेष राव, निरंजन,पेंटा गौड, प्रेम, प्रभू हरिदास यांनी श्री रेणुका देवीचे दर्शन घेऊन महाआरती केली. संस्थानच्या वतीने विश्वस्त चंद्रकांत भोपी, आशिष जोशी आशिष जोशी यांनी त्यांचा सन्मान केला.

logo
marathi.freepressjournal.in