सार्वजनिक बांधकाम विभागात डांबर घोटाळा; बिलातून उकळले शेकडो कोटी; जयंत पाटील यांचे पुरवणी मागणीत आरोप

सरकारमधील मंत्र्याच्या वरदहस्ताने डांबरच्या बिलातून शेकडो कोटी रुपये उकळले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागात डांबर घोटाळा; बिलातून उकळले शेकडो कोटी; जयंत पाटील यांचे पुरवणी मागणीत आरोप

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत पुरवणी मागणीवरील चर्चेदरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागातील डांबर घोटाळा उघडकीस आणला. सरकारमधील मंत्र्याच्या वरदहस्ताने डांबरच्या बिलातून शेकडो कोटी रुपये उकळले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

आर. डी. सामंत कन्स्ट्रक्शन नावाची एक कंपनी आहे. ही कंपनी रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शासकीय कामांचे कंत्राट घेते. आपल्या सरकारमधील एका मंत्र्यांचे सगेसोयरे या कंपनीमध्ये कार्यरत आहे. या मंत्र्यांचा वरदहस्तामुळे या कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी, नॅशनल हायवे इत्यादी विभागांमधील कामे घेऊन प्रचंड मोठा घोटाळा केला आहे.

ज्यावेळी डांबराची बिले एप्रिल २०२३ मध्ये उपअभियंता सा.बां. उप विभाग क्र.१ यांनी वापरली त्यावेळी बिल क्रॉस न करता ओरिजनल डांबराची बिले ठेकेदाराला परत केल्याने तीच बिले ठेकेदाराने दुसऱ्या कामासाठी म्हणजेच राष्ट्रीय महामार्गावर वापरून, न केलेल्या कामाच्या बिलाची रक्कम घेतलेल्या आहेत. या सर्व कामामध्ये संगनमताने साडेआठ कोटींपेक्षा जास्त रकमेचा अपहार झाला आहे, असे जयंत पाटील यांनी सभागृहात मांडले.

logo
marathi.freepressjournal.in