आकांक्षित महिला सक्षमीकरण योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

आकांक्षित महिला सक्षमीकरण योजनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी वरळी एनएसएससीआय डोम येथे शुभारंभ करण्यात आला.
आकांक्षित महिला सक्षमीकरण योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई : महिलांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा अभियान राबवण्यात यावे, यासाठी मुंबई महापालिका व मुंबई पोलिसांनी समन्वय साधत काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दरम्यान, आकांक्षित महिला सक्षमीकरण योजनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी वरळी एनएसएससीआय डोम येथे शुभारंभ करण्यात आला.

महिला सशक्तीकरणाच्या उपक्रमांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनाने बळकटी दिली आहे. महाराष्ट्र शासनाकडूनही महिला सशक्तीकरणासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या जात आहेत. महानगरपालिकेने देखील महानगरातील महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनविण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून विविध योजना अंमलात आणल्या आहेत. यापैकी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत आकांक्षित महिला सक्षमीकरण योजनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी वरळी एनएसएससीआय डोम येथे शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात काही महिला बचत गटांना मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यासह तब्बल ७० हजार आकांक्षित भगिनींच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) अनुदान जमा करण्यात आले. तसेच दिव्यांग स्वयंरोजगार योजना, पीएम स्वनिधी, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या लाभार्थ्यांनाही अनुदान वाटप करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, प्रत्येक महिला तिच्या कुटुंबाचा आधार असते. त्यामुळे ती स्वत:च्या पायावर उभी रहायला हवी. ती आत्मनिर्भर झाली तर घर, गाव, शहर आणि देश आपोआपच आत्मनिर्भर होणार. यामुळे महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी पालिका, महाराष्ट्र शासन सदैव तत्पर आहे. याच प्रयत्नांमुळे आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. कोणतेही काम पूर्ण करण्याचा निर्धार केला तर महिला मागे हटत नाहीत. याच नारीशक्ती बाहुंमध्ये बळ भरून देशाच्या विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत आकांक्षित महिला सक्षमीकरण योजना सुरू झाली आहे. महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतत विविध योजना अंमलात आणतात. केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रयत्नांमुळे मुंबईतील महिला अधिकाधिक सक्षम होत आहेत.

- दीपक केसरकर, मुंबई शहर जिल्हा पालक मंत्री

‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना’ १ एप्रिलपासून

केवळ महिलाच नव्हे तर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, तृतीयपंथी यांनादेखील नियोजन विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या परिघात आणल्याचे शिंदे यांनी सांगितले. तसेच सन २०२४-२५ च्या आर्थिक वर्षात आपण दिव्यांग व्यक्तींकरिता ‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना’ १ एप्रिल २०२४ पासून सुरू करीत असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in