विधानसभेची निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी असेल - उद्धव ठाकरे, पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांचा ठाकरे गटात प्रवेश

विधानसभेची आगामी निवडणूक ही विश्वासघाताच्या विरोधातील आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठीची असेल, असे शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी येथे सांगितले.
विधानसभेची निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी असेल - उद्धव ठाकरे, पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांचा ठाकरे गटात प्रवेश
Published on

मुंबई : विधानसभेची आगामी निवडणूक ही विश्वासघाताच्या विरोधातील आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठीची असेल, असे शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी येथे सांगितले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी मंगळवारी शिवसेनेत (उबाठा) प्रवेश केला, त्यावेळी ते बोलत होते.

पुणे हे आता राज्यातील सत्ताबदलाचे केंद्र बनेल, लोकसभेच्या निवडणुका घटनेच्या रक्षणासाठी होत्या, मात्र विधानसभा निवडणुका विश्वासघाताच्या विरोधातील, असहाय्यतेविरुद्धची आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठीची असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत बंड झाले आणि शिंदे मुख्यमंत्री झाले त्या संदर्भात उद्धव ठाकरे बोलत होते.

वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर मोरे यांनी लोकसभा निवडणूक लढविली होती. येथे भाजपचे मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला.

logo
marathi.freepressjournal.in