विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाचा आदेश डावलला : पवार

या निकालात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळ पक्षाला महत्त्व दिले. त्यांनी सुप्रीम कोर्टाचा आदेश डावलला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना सुप्रीम कोर्टात जावे लागेल.
विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाचा आदेश डावलला : पवार

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाविरोधात जाऊन निकाल दिला. खरे म्हणजे या अगोदर निकाल देताना सुप्रीम कोर्टाने राजकीय संघटनेला महत्त्व दिले होते. परंतु, या निकालात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळ पक्षाला महत्त्व दिले. त्यांनी सुप्रीम कोर्टाचा आदेश डावलला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना सुप्रीम कोर्टात जावे लागेल. त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळेल, अशी मला खात्री आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निकालानंतर पुणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. सुरुवातीला मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी त्यांच्याच बाजूने निकाल लागेल, असे भाष्य केले होते. यावरून यांना अगोदरच निकाल माहित होता, असे सांगत पवार यांनी आजच्या निकालात यत्किंचितही आश्चर्य वाटत नाही. कारण सत्ताधारी आणि त्यांच्या आमदारांनी निकालाबाबत वर्तवलेली शक्यता आजच्या निकालात ध्वनित झाल्याचे म्हटले.

विधिमंडळापेक्षा पक्षसंघटना महत्त्वाची

खरे म्हणजे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालात विधिमंडळापेक्षा पक्ष संघटना महत्वाची असते, हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. मात्र, विधिमंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वेगळा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निकालानुसार व्हीप बजावण्याचा अधिकार पक्ष संघटनेला असतो. विधिमंडळाला नाही, याकडे शरद पवार यांनी लक्ष वेधले. एका अर्थाने विधानसभा अध्यक्षांना ज्यांनी नेमले, त्यांचीच त्यांनी बाजू घेतली, हे यावरून दिसते, असेही पवार म्हणाले. त्यांच्या आमदारांनी निकालाबाबत वर्तवलेली शक्यता आजच्या निकालात ध्वनित झाल्याचे म्हटले.

विधिमंडळापेक्षा पक्षसंघटना महत्त्वाची

खरे म्हणजे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालात विधिमंडळापेक्षा पक्ष संघटना महत्वाची असते, हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. मात्र, विधिमंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वेगळा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निकालानुसार व्हीप बजावण्याचा अधिकार पक्ष संघटनेला असतो. विधिमंडळाला नाही, याकडे शरद पवार यांनी लक्ष वेधले. एका अर्थाने विधानसभा अध्यक्षांना ज्यांनी नेमले, त्यांचीच त्यांनी बाजू घेतली, हे यावरून दिसते, असेही पवार म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in