"...तर राज्यात मटक्याला अधिकृत परवानगी मिळले", 'या' नेत्याला दानवेंचा खोचक टोला

हे सरकार महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारं सरकार असल्याची टीका दानवे यांनी यावेळी केली
"...तर राज्यात मटक्याला अधिकृत परवानगी मिळले", 'या' नेत्याला दानवेंचा खोचक टोला

शिवसेना (शिंदे गट) आमदार संतोष बांगर यांना मंत्रीपद मिळालं तर महाराष्ट्रात मटक्याला अधिकृत परवानगी मिळेल, असा खोचक टोला राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लगावला आहे. हिंगोलीत प्रसारमाध्यांशी बोलताना दानवे यांनी बांगर यांच्यावर टीका केली. काही दिवसांपूर्वी बांगर यांनी आगामी मंत्रिमंडळ विस्तारात मला १०० टक्के मंत्रीपद मिळेल असं सांगितलं होतं. त्यावक्तव्यावरुन दानवे यांनी टीका केली आहे.

राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारला वर्ष पुर्ण झालं आहे. त्याबाबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी दानवे यांनी राज्य सरकारवर टिका केली आहे. सध्याच्या सरकार इतकं अपयशी सरकार राज्यात कधीच पाहीलं नाही. राज्यात भ्रष्टाचार सुरु असून शेतकऱ्यांचं कोणतंही काम होत नाही. शेतकऱ्यांवर अन्याय होत असून अतिवृष्टीची मदत देखील अद्याप झाली नाही, असं दानवे यांनी म्हटलं आहे. या सर्व कारणांवरुन हे सरकार महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारं सरकार असल्याची टीका दानवे यांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी सांगितलं की, पुढील मंत्रिमंडळ विस्तारात मला शंभर टक्के मंत्रीपद मिळेल. तुम्ही काळजी करु नका. असं ते म्हणाले होते. आम्हाला मराठवाड्यातील नेता मंत्रिमंडळात घ्यायाचा असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांनी सांगितलं असल्याचं बांगर म्हणाले होते. बांगर यांच्या या वक्तव्यावरुन अंबादास दानवे यांनी त्यांना खोचक टोला लगावला आहे.

३० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. आज या सरकारला एक वर्ष पुर्ण झालं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २९ जून रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांनाा सोबत घेत शिवसेनेतून बंड केल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळलं होतं.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in