

शहापूर : मध्य रेल्वेच्या आटगाव या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर शुक्रवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. स्थानक क्रमांक १ आणि २ जोडणारा बंद पादचारी पूल पाडण्याचे काम सुरू असताना लोखंडी सांगाडा अचानक कोसळून त्याखाली एक मजूर दबला जाऊन मृत्युमुखी पडला, तर दोन ते तीन मजूर गंभीर जखमी झाले. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने स्थानकावर प्रवासी नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
आटगाव रेल्वे स्थानकावर जुने तिकीटघर आणि जुना पादचारी पूल पाडण्याचे काम सुरू होते. पादचारी पुलाच्या जिन्याचा काही भाग अनेक महिन्यांपासून अपूर्ण अवस्थेत होता. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा उर्वरित भाग तोडण्याचे काम सुरू असताना पुलाचा लोखंडी सांगाडा अचानक कोसळला. त्यामुळे काम करणारे दोन मजूर पुलाखाली अडकले.
घटनेनंतर तातडीने रेल्वे पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अडकलेल्या मजुरांपैकी एका मजुराला बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र दुसरा मजूर कोसळलेल्या जिन्याखाली दाबला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
तुटलेल्या लोखंडी पुलाच्या सांगाड्याखाली अडकलेल्या मृत मजुराला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. अखेर गॅस कटरच्या सहाय्याने लोखंडी जिना कापून रेल्वे पोलीस, कसारा आपत्ती व्यवस्थापन पथक आणि शहापूर जीवरक्षक टीम यांच्या संयुक्त प्रयत्नातून मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मृत मजुराचा मृतदेह शहापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
अपघात या दुर्घटनेमागे ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळेच झाल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे अपघातानंतर रातोरात ठेकेदार व रेल्वे स्थानकावर पडलेला पुलाचा सांगाडा हटवण्यात आल्याने काही घडलेच नाही, असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचीही चर्चा परिसरात सुरू आहे. प्रशासनाच्या मदतीने