माझ्या घरावर हल्ला राजकीय विरोधकांकडून, कायदेशीर अधिकार असूनही पोलिसांनी जमाव पांगवला नाही - प्रकाश सोळंके

३० ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे(अजित पवार गट) माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर मराठा आरक्षणावरुन तापलेल्या जमावाने दगडफेक करत जाळपोळ केली होती
माझ्या घरावर हल्ला राजकीय विरोधकांकडून, कायदेशीर अधिकार असूनही पोलिसांनी जमाव पांगवला नाही - प्रकाश सोळंके

आपल्या घरावर झालेली दगडफेकी आणि जाळपोळीत राजकीय विरोधकांचा हात असू शकतो असा आरोप राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केला आहे. तसंच पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी कोणतीही कारवाई केली नाही, असा देखील आरोप सोळंके यांनी केला.

३० ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे(अजित पवार गट) माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर मराठा आरक्षणावरुन तापलेल्या जमावाने दगडफेक केली आणि मोठ्या प्रमाणावर जाळपोळ करण्यात आली होती. यात सोळंके यांच्या घराचं आणि गाड्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. याप्रकरणी सोळंके यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यावर भाष्य केलं. ते म्हणाले की, माझ्या घरावर जी दगडफेक आणि जाळपोळ झाली. त्यामध्ये राजकीय विरोधकांचा हात असू शकतो. तसंच जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना कायदेशीर अधिकार होते मात्र पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाही, असा देखील आरोप प्रकाश सोळंके यांनी केला.

ते म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं असताना देखील काही लोकांनी माझ्या घरावर दगळफेक करत जाळपोळ केली. या प्रकरणानंतर माझ्याबद्दल मनोज जरांगे-पाटीय यांना वाईट सांगितलं जात आहे. त्यामुळे त्यांनी इतरांचं ऐकून जाहीर सभेत माझ्याबद्दल वक्तव्य करु नये, अशी विनंती देखी त्यांनी जरांगे यांना केली.

आपल्यावर हल्ला करण्याचा उद्देश

प्रकाश सोळंके यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर सीसीटीव्ही पुटेजच्या आधारे त्यांनी हल्लेखोरांची ओळख पटवण्यात आली. यात इतर समाजाचे देखील लोक असल्याचं त्यांनी सांगितलं. यात अवैध धंदे आणि राजकीय विरोधकांकडून कट रचुन माझ्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप सोळंके यांनी केला. यावेळी काही हल्लेखोरांकडे धारदार शस्त्रे देखील होती, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे ते माझ्यावर हल्ला करण्याच्या उद्देशानेच आले असावे आसा दावा त्यांनी केला.

या कारणामुळे झाला प्रकाश सोळंके यांच्या घरावर हल्ला

राज्यात मराठा आंदोलनाचा विषय तापला असताना एका आंदोलकाने आमदार प्रकाश सोळंके यांना फोन केला. यावेळी आमदार सोळंके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं. त्यावरुन हा प्रकार घडलाच प्रकाश सोळंके यांनी आंदोलकाशी केलेली फोनवरील चर्चेची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. यानंतर प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करुन त्यांच्या घराला आग लावण्यात आली. यावेळी जवपास दीड तास ही दगडफेक सुरु होती. यावेळी जमावाकडून सोळंके यांच्या बंगल्याच्या आवारातील गाड्या देखील जाळण्यात आल्या. यावेळी प्रकाश सोळंके हे त्याच घरात उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in