सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रांतर्गत सप्टेंबर अखेर ११५ टक्के उद्दिष्ट पूर्तता

पीक कर्ज वितरण वार्षिक उद्दिष्टाच्या मानाने फक्त ४९ टक्के झाले आहे यावर जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रांतर्गत सप्टेंबर अखेर ११५ टक्के उद्दिष्ट पूर्तता

कोल्हापूर : जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक मंगळवारी ताराराणी सभागृह कोल्हापूर येथे संपन्न झाली. सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग क्षेत्रा अंतर्गत सर्व बँकांनी वार्षिक उद्दिष्टाच्या ११५ टक्के उद्दिष्ट पूर्तता सप्टेंबर अखेरच पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सर्व बँकांचे कौतुक केले. या वर्षी पतपुरवठा आराखडा सन २०२३-२४ अंतर्गत सप्टेंबर 2023 अखेर रु. १७ हजार ६१९ कोटींचा कर्जपुरवठा झाला असून वार्षिक उद्दीष्टाच्या ८२ टक्के उद्धिष्टपूर्तता झाल्याचे अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री. गोडसे यांनी सांगितले. यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये रु. ३ हजार १२२ कोटींचे कर्ज वाटप केले असून एमएसएमई क्षेत्रामध्ये मध्ये रु. ६ हजार १२९ कोटी कर्ज वाटप झाले. यावेळी त्यांनी विविध क्षेत्राकरिता वाटप झालेल्या बँक निहाय कर्जाचा आढावा दिला.

तसेच पीक कर्ज वितरण वार्षिक उद्दिष्टाच्या मानाने फक्त ४९ टक्के झाले आहे यावर जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. पिक कर्ज वाटपामध्ये सुधारणा करण्याच्या सूचना सर्व बँकेच्या जिल्हा समन्वयकांना देण्यात आल्या.

logo
marathi.freepressjournal.in